You are currently viewing श्रीकृष्णाची पालखी

श्रीकृष्णाची पालखी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”श्रीकृष्णाची पालखी”*

 

थकले झाले अधीर नयन

मोहना देशी कधी दर्शन!!

*”राधाकृष्ण गोपाल कृष्ण”*

कृष्ण राधे वीण राहे न क्षण

राधा करी जीवन अर्पण!!

*”गोविंद राधे गोविंद”*

कृष्ण जन्म आज शुभ दिन

जीवा शिवा भेटला आनंद!!

*”गोपाळा देवकीनंदन गोपाळा”*

कुंजवनी वेणु वाजवी श्रीरंग

स्वर ऐकून गवळणी दंग!!

*”पायी हळूहळू चाला मुखाने गोविंद बोला”*

मधुर स्वर येती बासरीतून

विसरती घरदार देहभान!!

*”राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी”*

द्रौपदीचे वेळी धावे संकटी

विष प्राशिले मीरे साठी!!

*”राधा रमण हरी गोविंद”*

गोकुळ आनंदले कृष्ण येण्यानं

राधा सृष्टीस लाभे चैतन्य!!

*”राधा कृष्ण गोपाल कृष्ण”*

सर्वाकर्षणाचे केंद्र कृष्ण

सुंदरतम रसिकेंद्र मोहन!!

*”गोविंद राधे गोविंद”*

कृष्ण जन्माचा दहीकाला दिन

ब्रह्मरूप हंडीचा मिळे प्रसाद!!

*”राम कृष्ण हरी राम कृष्ण”*

वेदशास्त्र नृत्य संगीत निपुण

निसर्गपूजक शिकवे पशुपालन!!

*”राधा रमण हरी गोविंद”*

खट्याळ मुत्सद्दी त्रिभुवनांत

कृष्णनिती करी मार्गदर्शन!!

*”कृष्ण कृष्ण म्हणा कृष्ण कृष्ण”*

केस काळे कांती चिरतरुण

राजस मुकुटधारी दिसे शोभून!!

*”गोपाळा देवकीनंदन गोपाळा”*

संघ शक्ती शिकवे कृष्णनीती

प्रेमळ गंभीर प्रसंगावधानी!!

*”गोविंद राधे गोविंद”*

करांत मुरली चक्र सुदर्शन

भक्तांसाठी उचले गोवर्धन!!

*”पायी हळूहळू चाला मुखाने गोविंद बोला”*

कृष्णास जावे अनन्य शरण

कृष्ण सर्वांचे करील कल्याण!!

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा