न्यु इंग्लिश स्कूल, उभादांडा विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित
वेंगुर्ले
न्यु इंग्लिश स्कूल, उभादांडा या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. उमेश रत्नाकर वाळवेकर यांच्या सेवानिवृत्तीपर समारंभात त्यांना शिक्षक भारती संघटना सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने सन २०२५-२६ चा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
वेंगुर्ले येथील साई डीलक्स सभागृहात श्री. वाळवेकर सरांचा सेवानिवृत्ती समारंभ पार पडला. यावेळी उभादांडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र आडारकर यांच्यासह संस्थेचे सेक्रेटरी रमेश नरसुले, आत्माराम गावडे, शिक्षक तज्ञ रमेश पिगुळकर, राधाकृष्ण मांजरेकर, शिवराम आरोलकर, सुजित चमणकर, निलेश मांजरेकर, सावळाराम कांबळी सर, सौ. अलका वाळवेकर, श्री बोडेकर सर, भिसे मॅडम तसेच विविध विद्यालयांचे शिक्षक, मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी, उभादांडा हायस्कूलचे सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून अनेकांनी वाळवेकर सर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
तर शिक्षक भारती संघटनेतर्फे वाळवेकर सर यांच्या ३५ वर्षांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री .प्रशांत आडेलकर, जिल्हा सचिव श्री. समीर परब, प्रमुख कार्यवाह श्री.संजय वेतुरकर ,राज्य अध्यक्ष श्री अशोक बेलसरे, संस्थापक श्री .कपिल पाटील तसेच सर्व शिक्षक भारती संघटना सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार वैभव खानोलकर सर यांनी मानले.
