शहरभर भाजपचे झेंडे; विशाल परबांच्या स्वागताला उत्साहाची किनार
सावंतवाडी :
भाजपात घरवापसी करणारे युवा नेते विशाल परब यांचे आज सावंतवाडीत जोरदार स्वागत होणार आहे. या निमित्ताने शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घरवापसी कार्यक्रमानंतर संध्याकाळी ४ वाजता ते भाजप कार्यालयाला भेट देणार असून, या वेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यासाठी भाजप कार्यालयासमोर भव्य मंडप उभारण्यात आला असून शहरातील प्रमुख ठिकाणी भाजपचे झेंडे लावून सजावट करण्यात आली आहे.
या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

