You are currently viewing मोहमयी गंधकुपी

मोहमयी गंधकुपी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मोहमयी गंधकुपी*

 

मोहमयी गंधकुपी

उघडता हळुवार

गंध स्मृतींचा पसरे

अचानक सभोवार – – – १

 

आई आठवली मला

वात्सल्याची जणू मूर्ती

गोड वागणूक तिची

तिच्यामुळे माझी कीर्ती –२

 

सखी लाभली प्रेमळ

स्नेह मिळे वारंवार

संकटात साथ केली

दिला मजला आधार – – – ३

 

माझे गुरू प्रज्ञावंत

शिकवण त्यांची खास

विपरीत जरी स्थिती

कधी नाही झाला त्रास — ४

 

 

मोहविती जुन्या स्मृती

माझी मी नच राहिले

इतिहास जुना सारा

अचानक आठवले – – ५

 

मोहमयी गंधकुपी

तिच्या पडले प्रेमात

किती सुंदर लाभला

स्मृतिगुच्छ हा हातात – – ६

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा