आज दिल्लीला भव्य सत्कार
पासपोर्ट मन म्हणून परिचित असलेले सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व सुप्रसिद्ध लेखक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढाकाराने गेल्या सात वर्षापासून भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरामध्ये एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या उपक्रमाचे नाव आहे पुढचं पाऊल. पुढचं पाऊल या संस्थेची निर्मिती डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी काही सनदी अधिकारी व काही सुज्ञ नागरिक यांना येऊन दिल्ली येथे केली.
आय ए एस या परीक्षेची मुख्य परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना माक इंटरव्यू करण्यासाठी या संस्थेने सर्वप्रथम पुढाकार घेतला. महाराष्ट्रातील जी मुले आयएएसची मुख्य परीक्षा पास झालेले आहेत. त्यांच्या मुलाखती घेण्याचे काम या संस्थेने केले. दिल्लीच्या जुन्या व नवीन महाराष्ट्र सदनच्या इमारतींचा या कामासाठी उपयोग करण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य घेण्यात आले. कुठल्याही खाजगी क्लासचा मॉक इंटरव्यू दिल्यापेक्षा सनदी अधिकारी असलेल्या लोकांनी घेतलेल्या मुलाखती निश्चितच आगळ्यावेगळ्या व अनुकूल अशा असतात. त्या दृष्टिकोनातून हे उचललेले पाऊल निश्चितच अभिनंदनीय आहे .
पुढचं पाऊल या डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या संस्थेने दुसरा एक उपक्रम सुरू केला. तो म्हणजे महाराष्ट्रातील जी मुले आयएएस होतात आणि मसुरीला प्रशिक्षणाला जातात त्या सर्वांचे दिल्ली येथे सत्कार करायला या संस्थेने सुरुवात केली. सत्काराची तारीख देखील आगळी वेगळी निवडली. यावर्षीचे सत्कार 20 ऑगस्टला आहेत आणि 21 पासून मसुरी येते प्रशिक्षणार्थी आयएएस आयपीएस आयआरएस व इतर सनदी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या नोंदणीला सुरुवात होत आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षण हे 25 ऑगस्टला सुरू होणार आहे. म्हणजे या सत्काराला विद्यार्थ्यांना मुद्दाम येण्याची गरज नाही. दिल्लीचा सत्कार आटोपला ही त्यांना लगेच मसुरीला जाता येईल. हा सत्कार त्याचबरोबर जे मुले आयएएस झालेली आहे त्यांचे इतर मुलांना मार्गदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. त्यासाठी त्यांनी यावर्षी 20 ऑगस्टला दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी संसद मार्गावरील दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
मिशन आय.ए.एस. चे सर्व संचालक या सत्काराला आवर्जून जातात. या वर्षी देखील तो पायंडा आमच्या संचालक मंडळाने कायम ठेवला आहे. या उपक्रमामध्ये सुप्रसिद्ध सनदी अधिकारी व सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी तेलंगणाचे श्री मोहन भागवत. सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्री रंगनाथ नाईकडे असिस्टंट कमांडर डॉक्टर चेतन शेलोटकर यासारखे मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम करतात. विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकीने काम करावे असा एक दृष्टिकोन देखील त्या मागचा आहे.
खरं म्हणजे डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी जे सातत्य यामध्ये ठेवलेले आहे ते महत्त्वाचे आहे. एखादा उपक्रम सात वर्षे चालवणे ही कठीणच बाब आहे. पण मुळेसरांचा स्वभाव हा जिद्दी आहे आणि त्यामुळे त्यांनी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. आयएएस आयपीएस आयआरएस या मुलांना संपर्क करणे त्यांना दिल्लीला बोलावणे त्यांची निवास भोजन व जाण्या-याण्याची व्यवस्था करणे हा सगळा उपक्रम हे आवडीने म्हणून करतात. महाराष्ट्रातील मुलांचा गौरव व्हावा हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून आयएएस व इतर सनदी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एका विचारपिठावर एकत्र येतात .परस्परांचा परिचय होतो. त्यात विचारांची देवाण-घेवाण होते .हा देखील उद्देश श्री मुळे सरांचा आहे. त्यांच्या या उपक्रमाला नवीन आयएएस व इतर सनदी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी चांगला प्रतिसाद देतात. या सत्कार समारोहाला सत्कारमूर्तींची आणि लोकांची चांगली उपस्थिती असते. कार्यक्रम देखील नीटनेटका असतो. आलेल्या लोकांची अल्पोपहार व चहापाण्याची व्यवस्था करायलाही मुळेसर विसरत नाही.
मागे मी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो
मी सरांना दिल्लीला फोन केला व मी कोल्हापूरला असल्याचे त्यांना कळविले. सरांनी माझे कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रम घडवून आणले. त्यांची संपूर्ण टीम कामाला लागली. आम्ही या तिन्ही जिल्ह्यातील शाळा कॉलेजेस पिंजून काढले. ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या. सरांचे प्रतिनिधी माझ्याबरोबर असायचे. त्यांनी माझ्या जाण्या येण्याची निवासाची भोजनाची सर्व व्यवस्था केली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वच कार्यक्रम उत्तम झाले. याच कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव असलेले श्री विकास खारगे ज्या शाळेमध्ये शिकले त्या इचलकरंजीच्या शाळेतही माझा कार्यक्रम घडवून आणला. डॉ. ज्ञानेश्वर मुळे आहेत ते असे. इतका समाजाभिमुख सामाजिक बांधिलकीच्या अधिकारी दुर्मिळच सापडतो.
स्वतः वरिष्ठ सनदी अधिकारी व पासपोर्ट मॅन तसेच चांगले लेखक असलेले आणि महाराष्ट्राच्या सनदी अधिकाऱ्यांमध्ये चांगला नाव लौकिक असलेले डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी हा जो वरील उपक्रम सुरू केलेला आहे त्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प
9890967003
9890967003

