You are currently viewing राष्ट्रपती पदकाचे मानकरी आयपीएस अधिकारी श्री नवीनचंद्र रेड्डी 

राष्ट्रपती पदकाचे मानकरी आयपीएस अधिकारी श्री नवीनचंद्र रेड्डी

महसूल मासानिमित्त प्रशासनातील दीपस्तंभ

 

राष्ट्रपती पदकाचे मानकरी आयपीएस अधिकारी श्री नवीनचंद्र रेड्डी

 

15 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झालेल्या पारितोषिकांमध्ये राष्ट्रपती पदकाचे मानकरी ठरलेले आय पी एस अधिकारी श्री नवीनचंद्र रेड्डी हे सध्या महाराष्ट्रातील नागपूर पोलीस आयुक्तालयात सह पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत .यापूर्वी ते अमरावतीला पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. एक कर्तव्यदक्ष तत्पर तेजस्वी व तपस्वी अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

 

साहेब अमरावतीला आल्यापासून तर अमरावतीवरून जाईपर्यंत त्यांचा माझा सातत्याने संपर्क राहिलेला आहे. मिशन आय ए एस च्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये ते सातत्याने सहभागी झालेले आहेत. एक हसतमुख सदाबहार कर्तव्यदक्ष उंच पूर्ण व्यक्तिमत्व लाभलेले नवीनचंद्र रेड्डी अमरावतीला असताना त्यांनी अमरावती शहरावर आपली अमिट अशी छाप सोडलेली आहे. एक चांगला पोलीस आयुक्त कसा असावा याचा आदर्श त्यांनी अमरावतीकरांसमोर ठेवला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते सातत्याने लोकाभिमुख राहिले आहेत. अमरावती शहरात होणाऱ्या विविध कार्यक्रमात ते सतत सहभागी झाले आहेत.

 

त्यांचा माझा ऋणानुबंध मिशन आयएएसमुळे फारच जवळचा आला. आम्ही दुसऱ्या वर्गापासून विद्यार्थ्यांना कलेक्टर होण्याचे प्रशिक्षण देत असल्यामुळे हा परिचय अजून घट्ट झाला. आपल्या कार्यकाळात ते नियमितपणे मिशन आयएएसच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत होते. एवढेच नव्हे तर त्यांचे सहकारी असलेले इतर अधिकारी श्री विशाल साळी सागर पाटील यांना पण ते आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाठवीत असायचे.

 

आमचे दरवर्षी मे महिन्यात दहा मे ते १६ मे असे सात दिवसांचे स्पर्धा राज्यस्तरीय परीक्षा संस्कार शिबीर अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ जवळील मार्डी रोडवरील ग्रीन सर्कल भागामध्ये असते. साहेब आठवणीने त्या शिबिराला न चुकता यायचे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. तसेच पोलीस आयुक्तालयात येण्याचे निमंत्रण द्यायचे.

 

त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांना पोलिस आयुक्तालयात घेऊन जायचे. त्या ठिकाणी साहेब विद्यार्थ्यांना पोलिस आयुक्तालयातील विविध उपविभागाची माहिती करून देत होते. आलेल्या विद्यार्थ्यांबरोबर सामूहिक फोटो सेशन व्हायचे. तसेच आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अल्पोपहार द्यायचे. मार्गदर्शन करायचे. बरेच विद्यार्थी त्यांच्याबरोबर स्वतःचे फोटो पण काढून घ्यायचे. अशा विद्यार्थ्यांची संख्या बरीच असायची. पण साहेब कंटाळा न करता हसतमुख चेहराने विद्यार्थ्यांना प्रतिसाद द्यायचे.

 

मागे एक वेळ गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीचे राणी दुर्गावती विद्यालयाचे श्री लोणबले सर हे त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन अमरावतीला आले होते. विद्यार्थ्यांची संख्या 70 80 होती. त्या सर्व विद्यार्थ्यांना पोलिस आयुक्तालय दाखवणे त्यांना मार्गदर्शन करणे त्यांना अल्पोपहार देणे ही सगळी कामे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या इतर अधिकाऱ्यांकडून करून घेतली होती . गडचिरोली सारख्या दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्तांची भेट म्हणजे एक पर्वणीच वाटली होती.

 

अमरावतीच्या सार्वजनिक जीवनामध्ये साहेब रुळले होते. कोणताही सामाजिक उपक्रम म्हटला की त्यामध्ये नवीनचंद्र रेडी यांचा सक्रिय सहभाग असायचा. कार्यक्रमास सहभागी होत असताना ते आपला पोलीस आयुक्त हा प्रशासकीय भाग बाजूला ठेवायचे. आणि अगदी सहज प्रवचने सामाजिक उपक्रमात सहभागी व्हायचे. सर्वांना भेटायचे सर्वांशी बोलायचे.

 

मागे मी त्यांच्यासमोर अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व 11 पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये मिशन आयएएस स्पर्धा परीक्षा कार्यशाळा हा उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव ठेवला. साहेबांना तो निर्णय आवडला आणि लगेच त्यांनी त्यांच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती पूनम पाटील यांना फोन केला व त्यांना योग्य त्या सूचना केल्या. त्याप्रमाणे मी लगेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पूनम पाटील यांना भेटलो. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी या उपक्रमाची सुरुवात करण्याची आखणी केली आणि एक चांगला उपक्रम अमरावती शहरातील विविध शाळामध्ये प्रारंभ झाला .

 

दरवर्षी 15 ऑगस्टला विविध पुरस्कार पदके जाहीर होतात. यावर्षीच्या पोलीस प्रशासनात जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदकांमध्ये श्री नवीनचंद्र रेड्डी यांच्या नावाचा समावेश आहे. राष्ट्रपती पदक देऊन प्रशासनाने त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली आहे. चांगले पोलीस अधिकारी समाजामध्ये बरेच काही घडवून आणू शकतात. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नवीनचंद्र रेड्डी हे आहेत. अमरावती शहरात त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमामुळे ते आजही नागपूरला सहपोलिस आयुक्त असले तरी अमरावती करांच्या हृदयात त्यांनी स्थान प्राप्त केलेले आहे. नागपूरमध्ये देखील ते आपल्या कर्तव्य दक्षतेमुळे व सामाजिक सहभागामुळे अल्पावधीतच आपला गोतावळा निर्माण करतील व सामाजिक बांधिलकीचे काम करतील याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यांना राष्ट्रपतीपदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व महसूल मासानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आय ए एस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा