मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन
वेंगुर्ले
महाराष्ट्रातील नामांकित विद्या विकास एज्युकेशन संस्था,मुंबई संचलित मातोश्री पार्वती राऊत विद्यालय,रेडी हुडावाडी ह्या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेच्या वतीने शालेय विद्यार्थी,पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ सकाळी १०:३०वाजता शाळेच्या सभागृहात करण्याचे योजिले आहे. सदर शिबीर हे SSPM हॉस्पिटल पडवे यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांची व पालकांची वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याच्या दृष्टीने निरोगी होण्याचा विचार करुन आरोग्य तपासणी शिबीराच्या माध्यमातून तपासणी करण्याचे योजिले आहे. तरी ह्या शिबिरास सर्व विद्यार्थी,पालक, ग्रामस्थांनी उपस्थित राहून सहकार्य करावेत.
तसेच सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्सव काळात विविध रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताचा तुटवडा हा प्रकर्षाने जाणवतो. हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्याचा उद्देशाने रक्तदान शिबिरात सर्व रक्तदात्यांनी सहभागी होऊन ह्या सत्कार्यात मदत करावीत,असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.गीता विल्सन व सल्लागार श्री.मधुकर मेस्त्री यांच्या वतीने करण्यात आले आहे.

