भाजप सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर – प्रभाकर सावंत
सिंधुदुर्ग
भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, ती पुढील तीन वर्षांसाठी (२०२५ ते २०२८) प्रभावी राहणार आहे. ही कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या मान्यतेने, तसेच मा. खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री मा. नितेशजी राणे आणि संघटन मंत्री मा. शैलेंद्रजी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर विजयसिंह सावंत यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीत जिल्हा सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, कोषाध्यक्ष, कार्यालय मंत्री यांसह विविध पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच, आजी-माजी प्रमुख पदाधिकारी, नेतेमंडळी यांचा ‘विशेष निमंत्रित’ व ‘निमंत्रित सदस्य’ म्हणून कार्यकारिणीत समावेश करण्यात आला असून, जिल्ह्यातील प्रत्येक प्रांतातील व विविध समाजघटकांतील कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
येत्या काही दिवसांत महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा, अनुसूचित जाती-जमाती मोर्चा, ओबीसी मोर्चा आणि इतर जवळपास ३० आघाड्यांची जिल्हास्तरीय रचना जाहीर होणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
नवीन कार्यकारिणीत समाविष्ट सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हाकार्यकारिणी
पदाधिकारी
श्री. प्रभाकर विजयसिंह सावंत – जिल्हाध्यक्ष; श्री. प्रमोद पुंडलिक रावराणे, श्री.अशोक वासुदेव सावंत, श्री. प्रसन्ना (बाळू) लक्ष्मण देसाई, श्री. अनिल (बंड्या) वामन सावंत,
श्री. संदीप एकनाथ गावडे, श्रीम. संध्या प्रसाद तेरसे, श्रीम. संजना संदेश सावंत, श्रीम. सुषमा सुर्यकांत खानोलकर, श्री. प्रमोद मधुकर कामत, श्री. संदीप (बाबा) मधुकर परब, श्री. महेश रमेश सारंग, श्री. रणजीत दत्तात्रय देसाई श्री. संदीप प्रकाश साटम, श्रीम. शारदा शरद कांबळे, श्री. विजय प्रताप केनवडेकर, श्री. सुधीर आबा दळवी, श्री. महेश मोहन धुरी, श्री. प्रकाश जनार्दन गोगटे, श्री. महेंद्र गजानन चव्हाण, श्रीम. भाग्यलक्ष्मी भालचंद्र साटम, श्रीम. प्राची देवानंद ईसवल्कर, श्रीम. सेजल संमेष परब, श्री. चारुदत्त रमाकांत देसाई
श्री. समर्थ शांताराम राणे- कार्यालय मंत्री.

