*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जनगणना …..माझी..!!*
जनगणना झाली माझी
जात लिहीली नाही
शेकडो वर्षांचं पाप
अंगावर घेतलं नाही…
खोदून त्यांनी विचारलं
भीक घातली नाही
ठाकूर देशाचा नागरिक
मला जात नाही..
व्यक्तीचित्रण मी कधीच
कागदावर उतरवत नाही
स्वतःची ओळख देतो
इतिहास सांगत नाही..
सटवाई ललाटरेषा लिहीते
कपाळ.. पुढेकरू नका
आडनावात जात शोधणा-यांनो
भ्रमिष्ट ..होवू नका..
मातीत ..मुळं माझी
मला नव्यानेच उगवायचं
जातीच्या भाऊगर्दीत मला
यापुढे नाही राहायचं..
भारत..माझी जात धर्म सारं काही…
बाबा ठाकूर

