You are currently viewing श्रावणी सोमवार

श्रावणी सोमवार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्रावणी सोमवार*

 

श्रावणातला सोमवार

शिवभक्तीचा सुगंध दरवळतो,

चालत येणारे क्षण

मनाला हर्ष देतात.

दुधाचा अभिषेक होताना

जणू मनाच्याच भावनांना पाझर फुटतो,

बेलपानाचा मृदू स्पर्श

आल्हाददायक वाटतो.

“हर हर शंभो” असा जप

कानाकानात गुंजतो ,

सोमवार आज पुन्हा

जुन्या स्मृतींत नेतो.

पायवाटेवर पसरतात

फुलांच्या पांढऱ्या रांगोळ्या,

भक्तीची अनाम ओढ

मनात मंद उमटते.

श्रावणातले हे सोमवार

नुसते उपवास नाहीत हो ,

ते असतात अनादि नाते

मन आणि महादेवातले.

कणाकणात भिनलेली

शांतता, प्रसन्नता देते,

तीच माझ्यावर गारुड करते –

पाचा उत्तरी कहाणी

साठा उत्तरी सफल संपूर्ण होते.

 

©️®️ डॉ सौ. मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा