सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील युवक-युवतींच्या विवाहासंबंधी अनेक समस्या निर्माण होत असल्याने येत्या काही दिवसांत मालवण तालुक्यात एक भरगच्च वधू-वर मेळावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विवाह जमत नसल्याची कारणे व त्यावरील उपाय यावरही मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
हा मेळावा कोणताही मोबदला न घेता मोफत आयोजित करण्यात येणार असून मधुचंद्र वधुवर संस्थाचे संस्थापक श्री. हरिश्चंद्र वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या सहकार्याने तो पार पडणार आहे.
२३ ऑगस्टपर्यंत इच्छुक वधू-वर पालकांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नंतर फोनवरून मेळाव्याची तारीख व ठिकाण कळविण्यात येईल. नोंदणीनुसार अंदाज घेऊन येणाऱ्या गणेशोत्सव काळातच मेळावा घेण्याची तयारी आहे.
“हा मेळावा कोणाला शह देण्यासाठी नसून, गाबीत समाजातील विवाहासंबंधी निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी आहे. अनेक वर्षे असे मेळावे झाले नाहीत. त्यामुळे समाजातील युवक-युवतींसाठी हा उपक्रम मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरेल,” असे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी सांगितले.
नावनोंदणीसाठी संपर्क :
श्री. सुरेश बापर्डेकर – 8104748637
श्री. विजय राऊळ – 9423052914
श्री. नारायण जाधव – 9867506627
श्री. तुळशीदास कासवकर – 8262898387
सौ. धनश्री चोडणेकर – 8275341120
समाजातील सर्व पालक व युवक-युवतींनी या मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
