You are currently viewing विलवडेत अचानक ब्रेक लावल्याने पिकअप टेम्पो पलटी

विलवडेत अचानक ब्रेक लावल्याने पिकअप टेम्पो पलटी

विलवडेत अचानक ब्रेक लावल्याने पिकअप टेम्पो पलटी

बांदा :

विलवडे – टेंबवाडी येथील खांबलेश्वर मंदिर जवळ गोव्यातून बेळगावच्या दिशेने सुसाट वेगात जाणारा पिकअप टेम्पो अचानक ब्रेक लावल्याने पलटी झाला. या अपघातात सुदैवानेच चालक व क्लीनर बालंबाल बचावले. स्थानिकांनी मदतकार्य करत दोघांनाही टेम्पोतून बाहेर काढले. रस्त्याच्या मधोमध टेम्पो पलटी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात टेम्पोचे नुकसान झाले आहे. सदर टेम्पो बेळगावहून भाजीपाला घेऊन गोव्यात गेला होता. गोव्याहून परतताना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा