वेंगुर्ला :
कोकण आयुक्त श्री डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आरवली येथील श्री देव वेतोबा देवस्थानास सपत्नीक भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जयवंत राय यांनी त्यांचे स्वागत करून सन्मान केला.
यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान परिसरातील पायाभूत सुविधा, परिसराची स्वच्छता, सुयोग्य व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती घेऊन आयुक्त सुर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच श्री देव वेतोबाची सर्वदूर पसरलेली ख्याती नवसास पावणाऱ्या देव व त्यांच्या पादत्राणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. जयवंत राय, श्री. सचिन दळवी, तहसीलदार श्री ओतारी, पोलीस पाटील श्री मेस्त्री, मंडळ अधिकारी श्री मयेकर, तलाठी श्री. गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
