You are currently viewing सिंधुदुर्ग येथील खरातवाडी सांस्कृतिक मंडळ थोरले मोहुळ नाटळ मुंबई( रजी.) यांचा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली कोकण प्रदेश संघटनेला जाहीर पाठिंबा

सिंधुदुर्ग येथील खरातवाडी सांस्कृतिक मंडळ थोरले मोहुळ नाटळ मुंबई( रजी.) यांचा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली कोकण प्रदेश संघटनेला जाहीर पाठिंबा

*सिंधुदुर्ग येथील खरातवाडी सांस्कृतिक मंडळ थोरले मोहुळ नाटळ मुंबई( रजी.) यांचा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली कोकण प्रदेश संघटनेला जाहीर पाठिंबा*

*कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज काळे व जिल्हा सल्लागार गुरुप्रसाद खरात यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मंडळाचे सल्लागार मधुकर खरात यांच्या सूचनेने घेतला निर्णय*

*मंडळाची 15 ऑगस्ट 2025 रोजी सर्वसाधारण सभा संपन्न*

*मुंबई –* सिंधुदुर्ग येथील खरातवाडी सांस्कृतिक मंडळ थोरले मोहुळ नाटळ मुंबई( रजी.) हे ४४ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून नाटळ पंचक्रोशीतील धनगर समाज्याच्या सर्वांगीण विकासाठी संघर्षरत असून माजी सैनिक कै.डॉ बी आर खरात (संस्थापक अध्यक्ष सिंधुदुर्ग धनगर समाज सेवा संघ ( रजी.) यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन प्रदीर्घ काळ वाटचाल करत आहे.या मंडळाची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक-१५/०८/२०२५ रोजी दुपारी २.३० वाजता विजय मलंग को.ऑ.हौसिंग सोसायटी ऑफीस,तळ मजला,PMG कॉलोनी मानखुर्द,पश्चिम. या ठिकाणी आयोजीत केली होती.तरी सभेला सर्व सभासद यांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य केले.
सभेचे सूत्र संचालन मंडळाचे सचिव श्री संतोष दु. खरात यांनी यांनी केले . सभेची सुरुवात माजी स्वातंत्र्य सैनिक व मंडळाचे संस्थापक कै.श्री. बाबुराव खरात यांच्या पुण्य स्मरणाने करण्यात आली.
सभेच्या परिपत्रका प्रमाणे सभेचे पुढील विषय घेण्यात आले.
आजच्या सभेच्या अध्यक्षाची पदी पदसिद्ध आजी अध्यक्ष मा. श्री.प्रकाश कों शिंदे यांची निवड केली.मागील सभेचे मिनिट्स वाचून त्यास मंजुरी दिली.जमा खर्च याचे वाचन केले.पारंपरिक सांस्कृतिक मंडळ रजिस्ट्रेशन केले त्याबद्दल माहिती देऊन सर्व कागद पत्र प्रकाशित करण्यात आली .मंडळाची सभासद वर्गणी संदर्भात निर्णयाला मान्यता दिली.नवीन मंडळाचा सभासद
गावचा रहिवाशी असो किंवा मुंबई मधिल असो सर्वांनवर एकच समान वर्गणी त्या प्रमाणे सभासद बनवण्या संदर्भात निर्णय घेतला. पूर्वज भंडारा २०२६ नियोजन संदर्भात चर्चा आणि मान्यता दिली. मंडळाचे सल्लागार व प्रवक्ते म्हणून मा.श्री .गुरुप्रसाद खरात यांची नियुक्ती करण्यात आली तसेच कर सल्लागार म्हणून श्री संतोष रामचंद्र खरात व सल्लागार म्हणून श्री सुभाष सीताराम खरात यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. सध्याची मंडळ कार्यकारणी कायम ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी श्री गुरुप्रसाद खरात यांनी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची माहिती सदर सभेत दिली व कोकण प्रदेश अध्यक्ष मा. श्री.नवलराज काळे यांच्या कार्याची माहिती दिली.ही सर्व माहिती ऐकल्यावर सल्लागार मा .श्री.मधुकर मंगेश खरात यांच्या सल्ल्याप्रमाणे सिंधुदुर्ग येथील खरातवाडी सांस्कृतिक मंडळ थोरले मोहुळ नाटळ मुंबई( रजी.) मंडळाच्या सर्व सदस्य ,पदाधिकारी व अध्यक्ष यांनी ,
महासंघाचे कोकण प्रदेश अध्यक्ष श्री. नवलराज काळे साहेब व सिंधुदुर्ग जिल्हा सल्लागार प्रवक्ते मा .श्री. गुरुप्रसाद खरात यांच्या सोबत ऑल इंडिया धनगर समाज महासंघ( दिल्ली ) कोकण प्रदेश यांचे बरोबर पत्रव्यवहार करून त्यास पुढील वाटचालीस पूर्ण सहकार्य करील . या पुढे कोकण धनगर समाजाचे हित पाहणाऱ्या महासंघाला आमचा जाहीर पाठिंबा राहील असे मा.अध्यक्ष श्री प्रकाश शिंदे व मा.सचिव संतोष धुळजी खरात आणि मंडळाच्या कार्यकारिणीने जाहीर केले.वरील निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.अध्यक्ष श्री.प्रकाश कों शिंदे सचिव,श्री.संतोष धु.खरात.खजिनदार श्री. सुनिल ल.खरात.सल्लागार प्रवक्ते श्री. गुरुप्रसाद खरात, सल्लागार मधुकर खरात,पांडुरंग खरात,नामदेव खरात,संतोष खरात,रामचंद्र खरात, अशोक खरात , सुभाष खरात ,सदाशिव खरात ,श्रीकांत खरात,राजू खरात,नितेश खरात,आनंद खरात ,शेळके ,शिंदे आणि खरात, बांधव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा