You are currently viewing मन अस्वस्थ का होतं

मन अस्वस्थ का होतं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

 

*मन अस्वस्थ का होतं*

*******************

 

माणसाचं मन इतकं संवेदनशील असतं की कोणी बोलल‌ं तरी मन गहिवरून येतं अगदी भाऊक होवून चेहऱ्यावर नैराश्य दिसते.माणूस एव्हढा भाऊक का होतो हा प्रत्येकाला प्रश्न पडतो,खरचं मन फारच संवेदनशील असतं.कोणी बोललं रागावल,चिडलं तर मनावर ओरखडे पडतात.अशावेळी या जखमी मनावरच्या वेदनांना एक हळवी फुंकर हवी असते. कारण रोज कोणी ना कोणी मनावर घाव‌ घालत असतात घरात,बाहेर,ऑफिसात प्रवासात, आपले जवळचे संबंधितांकडून छोट्या छोट्या गोष्टींसाठी मन दुखवल जात. त्यामुळे मन अस्वस्थ होतं.कधी कधी काम करूनही उर्मट त्रासांना सामोरं जावं लागतं.मग अशावेळी प्रश्न पडतो की माणसाने कसं वागावं चांगलं रहावं की राहू नये,काही कळत नाही.काही सहन करून गप्प बसतात तर काही लगेचच उत्तराला उत्तर देऊन मोकळे होतात.काही तर उगाचच कारण नसताना बोलतात.त्यामुळे काय होतं की जे फटकळ असतात अशांना कोणी बोलतं नाही,रागवत नाही ते लगेचच बोलून टाकतात.पण जे सहन करतात,ऐकून घेतात त्यांची मात्र फजीती होते.ते काहीही बोलत नाहीत.खर तर कोणी बरं वाईट बोललेल सहन करण्याइतकी सहनशीलता किंवा मानसिकता आज तरी कोणात दिसत नाही.ऐकून घेण्या ईतके आज्ञाधारक आजच्या काळात फार कमी आहेत.किंवा एखाद्याच्या काहितरी व्यक्तीगत अडचणी असतात म्हणून संबंधित व्यक्तीला एकूण घ्यावं लागतं.पण काम करून ही बिनकामाचं कोणी बोलत असेल तर आजमितीला कोणी ऐकत नाही आणि का म्हणून ऐकून घ्यावं उगाचच?.चुकत असेल तर ऐकून घ्यायला हरकत नाही पण एखाद्याला उगाच टार्गेट करून त्याचा छळ होत असेल तर ते योग्य नाही.म्हणून माणसाने माणसांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन मनावर कुठलीही इजा व्हायला नको एव्हढी काळजी घेऊन जर बोललात ना तर मनाचं मनाशी भावनिक नातं तयार होतं.पण हल्ली तर काय जशास तसे राहून वागायला हवे अशी मनोधारणा लोकांची झाली आहे.माणसाचं मन हे समुद्रासारखं असतं जसा मुड बदलेल तसे मन बदलतं कधी शांत तर कधी भरकटलेल.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कितीदा मन अस्वस्थ झाल्याचा अनुभव आपण घेत असतो.पण मन अस्वस्थ होत याची जाणीव दुसऱ्यांना नसते.कधी कधी उगाचंच आपण काही ना काही अपेक्षा बाळगतो कदाचीत कुणाकडून ती पुर्ण होईल या अपेक्षेने मनात ती घोळत असते पण जर मनात जे ठरवलं ते जर का झालं नाही तर मनात एक अस्वस्थतेची भावना निर्माण होते.आपली अपेक्षा ईच्छा पुर्ण होत नाही म्हणून मनात अनेक विचारांचा कलह छळतो आणि नैराश्याच्या जाळ्यात स्वतःला गुरफटून घेतो.भविष्यात काय होईल याची अनिश्चितता अनेकदा मनाला अस्थिर करत असते आणि या असल्या भितीचा परिणाम थेट मनावर,मानसिकतेवर,वागण्यावर दिसून येतो.

मनाला प्रत्येक गोष्ट हवीशी वाटते पण नाही मिळाली तर एक नकारात्मकत भाव मनात तयार होतो.नकळतपण निमीत्तमात्र आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून दुरावत असते नकळतपणे काही मतभेद झाले असतील तर मन अधीक अस्वस्थ होते.आजकाल तर सोशल मीडियावर सतत यशस्वी लोकांचा त्यांच्या प्रगतीचा लेखाजोखा बघतो. इतरांचे परफेक्ट क्षण बघितल्यामुळे आपण आपलं समाधान हरवून बसतो आपण तसे का होवू शकतं नाही,आपण कुठेतरी मागे पडतोय याची जाणीव हेत असते. खर पाहता आपण जसे आहोत जिथे आहोत तिथे परफेक्ट असतो पण दुसऱ्याचं अनुकरण आपल्या मनाला अस्वस्थ करत असतं.थोडक्यात काय तर जसे विचार करणार तसे मन तयार होते. जसे बघणार तसे मन आकार घेते.आपण काय करतो का करतो हे आपल्याला कळत नसते.एक ठरावीक चौकटीत आपलं आयुष्य, आपलं जगणं बांधलं गेलं असल्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी मन सांगत असतं. एका रूटीनमध्ये अडकल्यामुळे माणूस माणसापासून दुखावतो, दोघांमध्ये संवाद होत नाही,संवाद होत नाही म्हणून मन अशांत होतं.खरतर कोण काय करतं याकडे लक्ष न देता दररोज काही मिनिटे शांत बसून आपल्या मनाशी बोलायला हवं,मनाशी हितगुज केल्याने आपल्यातील कमतरता आपल्याला कळते आपण कुठे कमी पडतो याचा उलगडा सपाडतो धावपळीच जग आहे इथे कुणाला वेळ नाही.माणसं धावताय, जगण्यासाठी पळताय, पोटासाठी राबताय अशावेळी मनाशी संवाद साधता येत नाही पण डोक्यात जर नकारात्मक विचार असतील तर ते बाहेर काढून सकारात्मक विचार करायला हवा.सकारात्मक विचार केल्यामुळे मन सक्षम होते मनाला एक बळकटी मिळते.माणसाचं जगणं परिपुर्ण नसलं तरी आपल्या अवतीभोवती काही सुंदर क्षण असतात ते डोळेभरून जरी पाहीले तरी मरगळलेल मन टवटवीत होते. छोट्या छोट्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न करायला हवा आपणच आपल‌ं कौतुक करावं कधी कधी आपणच आपलं गुणगुणाव मनसोक्त नाचून घ्यावं खदखदून हसून घ्यावं,जे चांगल दिसतंय ते बघताना डोळ्यात भरून घ्यावं.कोण काय म्हणेल याकडे लक्ष न देता जगण्याचा आनंद घ्यावा म्हणजे मन कधीच अस्वस्थ होत नाही.अर्थात कशात तरी मनाला गुंतवून ठेवायला हवं.काय असतं की मन अस्वस्थ होणं ही मानवी स्वभावाची ओळख आहे ती आपल्याला थांबायला,विचार करायला,अणि बदलायला भाग पाडते.मन‌ खूप हळवं असल्याकारणाने वरवर कणखर दिसणार माणूस आतून खूप हळवा असतो अशा हळव्या मनावर एक जरी ओरखडा पडला तरी मनावर ती जखम कायम सलत रहाते. संवेदनशील मनावरची जखम काही करता लवकर बरी होत नाही.

मन हळवं होते तेव्हा मनाची अस्वस्थता माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलवत असते.मन हळवं होणं ही एक सहज क्रिया आहे जी शब्दांमध्ये सीमित होऊ शकत नाही.कधी कधी एखाद्या क्षणांच सौंदर्य आपल्या मनाला इतकं छान वाटतं,की मनामध्ये एक हलका, ओलसर स्पर्श गारवा देतो.किंवा एखाद्या आठवणींनी,चुकलेल्या गोष्टींनी,किंवा आपल्याला हवं असलेलं काही न मिळाल्याच्या कडवट आठवणींनी मन हळवं होतं. तेव्हा कळतं की काही गोष्टी शब्दांमध्ये बांधता येत नसतात.पण त्या हळव्या क्षणांनी दिलेली शांती,त्या दुखऱ्या वेदनांनी दिलेली उमज,ती खरी अस्वस्थता नव्हे,तर एक जाणीव असते की जीवनातील प्रत्येक वेदना,प्रत्येक क्षण,आपल्याला खरा अनुभव देतो.

कधी कधी आपल्या जवळची व्यक्ती आपण तिला आपलं समजतो पण त्यांच्याकडून जर मन दुखावले तर त्यावेळी मन हळवं होतं,कारण आपण त्यांच्या मनाचा भावनांचा विचार करून त्यांच्याशी वागतो बोलतो त्यांच्या दुःखात आपल दुःख बघतो.पण ज्याला आपण उगाचंच आपलं समजतो तो जर बरं वाईट बोलतं असेल तर त्यांच्या चुकलेल्या कृतींमुळे आपलं मन कमकुवत होतं, कधी कधी हे दुखणे आपलं नसतानाही आपल्या मनावर खोल जखम होते आणि मनाच्या नाजूक कोपऱ्यात न बरा होणारा घाव कायम रहातो.दुसऱ्याने दिलेल्या वेदनांचा कडवटपणा खूप जास्त असतो.हळवं होणं म्हणजे फक्त दुःख नाही तर कधी न कळणारी तृप्तता देखील असू शकते.या असलेल्या दुखांच्या आवरणात,आपल्याला त्या दुखापतीच्या पलिकडून काहीतरी अधिक मिळवायचं असतं.तेव्हा तुम्ही एकटे असालात तरी त्या एकटपणात ज्यांच्याकडून मन दुखावले गेले असेल तर त्यांच्या बद्दल संतापाचा एखादा मूक संवाद सुध्दा शब्दांत मांडता येत नाही.पण त्यांच्यामुळे हळवं होतांना आपल्याला जगण्याची एक अद्भुत समज येते.आणि आपल्या अवतीभोवती अशीच माणसे असतात याचा अनुभव येतो.म्हणजे हे केवळ दुःख आहे की यापेक्षा आणखी काहीतरी आहे?” या प्रश्नाचे उत्तर मन हळव्य होतांना सापडतं.मन हळवं होतं तेव्हा तो थांबलेला क्षण,जो त्यावेळी कधीच कळत नाही,तिथे आपण आपल्या आयुष्याचं एक नवं दर्शन पाहतो. केवळ दुःख किंवा पीडा नव्हे,तर त्या एका तुटलेल्या नात्यामुळे त्या माणसाला परकेपणाचा साक्षात्कार,होतो.कधी कधी आपण असं समजतो की आपल्याला हसण्यासाठी,बोलण्यासाठी,काहीतरी सकारात्मक विचार मांडण्यासाठी कोणीतरी हक्काचा व्यक्ती जवळ असायला हवा.पण आपण तिथेच चुकतो हळवं होणं ही एक कृती आहे ती थांबवायची नसते.तुम्हाला दिलेला प्रत्येक झटका,प्रत्येक वेदना, ते आपल्याला दुसऱ्यांच्या दुःखाचा सामना करण्याची,त्या वेदनेला समजून घेण्याची ताकद देते.मन हळवं होणं हे खूप वेळा जीवनाच्या वास्तवाशी एक संवाद साधण्याची समज देते.त्याच्या पलीकडं आपल्याला सापडते एक वास्तविकता जी जितकी त्रासदायक तितकीच अत्यंत सुंदर देखील वाटते त्याच कारण असं की त्रासातून माणूस कळतो.माणसाची मानसिकता इतकी भोळसट असते की माणूस प्रत्येकाला आपला समजतो.पण ज्याला आपण आपला समजतो त्याच्या मनात काय चाललंय हे कळत नाही.म्हणून मनाची दुखापत झाल्याशिवाय माणूस कळत नाही.तेव्हा माणसाने माणसाला आपलं समजून घेण्याधी तो किती चांगला किती वाईट हे समजून घ्यायला हवं. नाही तर मनाच्या जखमेवर फुंकर सुध्दा घालता येतं नसते.शेवटी काय तर मन हळवं होतं तेव्हा आपल्याला केवळ शब्दांचीच गरज नसते तर मनातल्या भावनांना, अश्रूंना वाट मोकळी करून द्यायला एक खांदा ही हवा असतो. कारण काय असतं की जेव्हा माणूस एकटा पडतो ना तेंव्हा त्याच्या जवळ मनाशिवाय दुसरं कोणी नसतं. अशावेळी दुखावलेला माणूस मनाशी बोलतो आपलं दुःख वेदना मनाला सांगतो.मन समजून ही घेत आणि त्याच निराकारण ही करतं. आपलचं मन आपला मार्गदर्शक असतो,मित्र असतो,आपला गुरू असतो.आपल्या जीवनात प्रत्येक सुख दुःखात,संघर्ष आणि आनंदाच्या क्षणी मनाच एक वेगळं अस्तित्व असतं म्हणून कधीतरी केंव्हा तरी आपण आपल्या मनाशी हितगुज केले पाहिजे.कारण मन आपल्या भावनांना समजून घेतं आपल्याला जे काही वाटतं निःसंकोचपणे, मनमोकळेपणाने मनाला सांगुन टाकावं.मग बघा मनावरचा ताणतणाव,चिंता एका क्षणात कुठच्या कुठे पळून जाते.नाहीच कोणी तर आपणच स्वतःमनाशी बोलायला काय हरकत आहे.म्हणजे मनाशी बोलणं,मनाच्या भावना समजून घेणं हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.राग,रूसवा,चिंता,द्वेष आनंद,सुख,दुःख,प्रेम,भिती,नैराश्य हे सर्व मनातून निर्माण होत असतं मनावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवले तर माणसा माणसात आणि मना मानतात दुरावा होत नाही.म्हणून मनाला समजून घेतांना मनाशी संवाद साधला गेला पाहिजे.आजच युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे.तेव्हा कोणी कुणाला समजून घेत नाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी माणूस नैराश्येत जातो. सहण करण्याची क्षमता त्यांच्यात नसते प्रत्येकाला पराभव मान्य नसतो सतत जिंकत रहाव असं वाटतं त्यामुळे एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर नको ते विचार मनात येतात आणि मग कधी कधी होत्याच न होत. यासाठीच मनाशी संवाद साधला पाहिजे आणि मनाचंही ऐकलं पाहिजे.आपण जगाशी संवाद साधतो पण स्वतःशी बोलत नाही.आपलं मन आपला आरसा आहे आणि मनचं आपलं समाधान करू शकतं म्हणून जनसंवादा बरोबर मनसंवाद ही व्हायला हवा.कारण मन शांत असेल तर सारे विश्व सुंदर वाटते,मन अशांत असेल तर दिवसाही अंधार दिसतो. तेव्हा मन अस्वस्थ व्हायला नको असं वाटतं असेल तर रोज काही क्षण आपण आपल्या मनासाठी राखूया आणि मनाशी हितगुज करूया काय……!

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा