बाळकृष्णाची पूजा करून भक्तिमय वातावरण
सावंतवाडी : गोकुळाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात बाळकृष्णाची पूजा करण्यात आली. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी पोलिस लाईन येथील मंदिरात विधीवत पूजा केली.
यावेळी मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी मंत्रोच्चारांच्या गजरात बाळकृष्णाची पूजा करून भगवान श्रीकृष्णाचे पूजन केले.
या प्रसंगी सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पूजेनिमित्ताने पोलिस ठाण्यातील वातावरण भक्तिमय झाले.
