You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहिहंडी उत्साहात साजरी

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहिहंडी उत्साहात साजरी

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहिहंडी उत्साहात साजरी

सावंतवाडी

सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी मध्ये शनिवार दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी दहिहंडी कार्यकम उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी नर्सरी, ज्युनिअर व सिनिअर केजीची मुले बालकृष्ण व राधेच्या पारंपारीक वेशभूषेत सहभागी झाली होती. सिं.जि.शि.प्र. मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब हर हायनेस श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोंसले , कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रध्दाराजे लखमसावंत भोंसले व मंडळाचे सदस्य श्री.जयप्रकाश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेत आकर्षकरीत्या सजवलेली दहिहंडी फोडून चिमुकल्यांनी आनंदाने उत्सव साजरा केला. यावेळी बहुसंख्य पालकवर्ग देखील सहभागी झाला होता. कार्यकम यशस्वी करण्यासाठी श्रीम. सिंड्रेला परेरा, श्रीम. सेलिन बर्नार्ड, श्रीम. आकाशवाणी सावंत, श्रीम. सिद्रा शेख व श्रीम.निकिता आराबेकर या शिक्षिकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

या कार्यकमासाठी सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले , संस्थेचे संचालक श्री .डी. टी.देसाई सर, सहाय्यक संचालक ॲड.शामराव सावंत सर, संस्थेचे पदसिद्ध सदस्य डॉ.सतीश सावंत सर तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक- शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा