महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित प्रांताध्यक्ष, माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कोळीवाड्यातील जमिनी मच्छिमारांच्या नावे करण्यासाठी धोरण निश्चित करण्याचे आदेश दिल्या बाबत नाना पटोले यांची भेट घेतली. – अरविंद मोंडकर
मच्छिमार रहात असलेली गावे कोळीवाडे मच्छीमारांच्या नावे करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील कोळीवाड्यातील जमिनींचे सध्या सीमांकन सुरू असून राज्य शासनाने या जमिनींसंदर्भात धोरण निश्चित करून या निवासी आणि व्यवसायासाठीच्या जमिनी मच्छिमारांच्या नावावर करावी. – महिंद्र सावंत (जिल्हा सरचिटणीस)
कोळी, गबित या समाजाला न्याय द्यावा असे निर्देश दिले असल्याने तसेच सध्या भूमिअभिलेख विभागामार्फत मच्छिमार गावांची सीमांकन सूरु आहे जे मूळ कोळी कोकणात गाबीत आणि आदिवासी बांधव आहेत. त्यांचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कोळीवाड्याच्या जमिनीसंदर्भातील समस्यांवर न्याय मिळणे गरजेचे होते.
केवळ कोळीवाडा परिसरातील सीमांकन करून न थांबता संबंधित पट्टा मूळ रहिवाश्यांच्या नावावर देण्यासंदर्भात कार्यवाही करणे गरजेचे होते.
यासाठी शासनाने सर्वंकष धोरण निश्चित करून कार्यवाही करावी तसेच मुंबईबरोबर मूळ कोकणातील सिंधुदुर्ग – रत्नागिरी ७२० किमीच्या सागरी किनारपट्ट्यांमध्ये स्थानिक मच्छिमारीचा पारंपरिक मासेमारी व्यवसाय करीत आहेत.
मुंबईतील कोळीवाड्यांप्रमाणे, कोकणातील जमिनीच्या सीमांकनाच्या बाबतीत कोणतीही भीती या समाजाने बाळगू नये. मूळ निवासींना जमिनीचे पट्टे नावावर करून दिले जातील असे नाना पटोले म्हणाले होते या संदर्भात व नवनिर्वाचित प्रांताध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांची भेट सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महेंद्र सावंत व युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी घेतली.
महिंद्र सावंत
जिल्हा सरचिटणीस, सिंधुदुर्ग