You are currently viewing यशोदेच्या कान्हा भारीच ग खट्याळ

यशोदेच्या कान्हा भारीच ग खट्याळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम गवळण*

 

यशोदेच्या कान्हा भारीच ग खट्याळ

गोपीका मात्र साध्या भोळ्या मवाळ|धृ||

 

घरांत घुसुनी खाई,दूध दही लोणी

आवाज मांजरीचा काढतसे कोणी

खोड्यांना त्याच्या‌ नसे वेळ काळ

गोपीका मात्र साध्या भोळ्या मवाळ. ||१||

 

गोपीकांच्या करी मागे मागे फार

पदर ओढे,वाट अडवे,सतावे अपार

कान्ह्याच्या तक्रारींचा झाला हो सुकाळ(खूप या अर्थी)

गोपीका मात्र ,साध्या भोळ्या मवाळ||२||

 

तरीही लोभस कान्हा, आवडे सर्वांना

पावरी त्याची वेड लावी सजीवांना

मंत्रमुग्ध करी, सर्वांना हा लडिवाळ

गोपीका मात्र साध्या भोळ्या मवाळ ||३||

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.‌

प्रतिक्रिया व्यक्त करा