You are currently viewing महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था शिरगावात स्वातंत्र्यदिन सोहळा

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था शिरगावात स्वातंत्र्यदिन सोहळा

महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या मंजिरी कांबळे हिच्या हस्ते ध्वजारोहण

 

रत्नागिरी / शिरगाव :

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव प्रकल्पात गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेली स्तुत्य परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. महाविद्यालयाच्या (BCA) तृतीय वर्षात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. मंजिरी कांबळे हिच्या हस्ते ७९ वा स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळा पार पडला.

या उपक्रमामुळे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थिनींमध्ये देशभक्ती, जबाबदारी आणि आत्मगौरवाची भावना दृढ होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर ध्वजारोहणानंतर विद्यार्थिनींनी देशभक्तिपर गीते, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

कु. मंजिरी कांबळे हिने S.N.D.T. विद्यापीठ आयोजित अविष्कार रिसर्च कॉम्पीटीशन मध्ये प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. यावेळी तिने सर्व विद्यार्थिनींना विविध स्पर्धांत सहभागी होऊन सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा