You are currently viewing ७९ वा स्वातंत्र्य दिन ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा

७९ वा स्वातंत्र्य दिन ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा

७९ वा स्वातंत्र्य दिन ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा

गावाच्या विकासात ग्रामस्थांचा मोलाचा वाटा – सरपंच सुशिल कदम यांचे मनोगत

कणकवली
७९ वा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव ग्रामपंचायतीच्या आवारात अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुशिल कदम यांनी भारतमातेसाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना मानवंदना अर्पण केली.

मनोगत व्यक्त करताना सरपंच श्री. कदम म्हणाले की, “गावाचा सर्वांगीण विकास करताना ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास आणि सहकार्यामुळेच आपली ग्रामपंचायत कणकवली तालुक्यात स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांक पटकावू शकली. हे यश सर्व ग्रामस्थांचे आहे.” यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभारही मानले.

कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन सावंत यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आणि ग्रामपंचायतीच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली.

कार्यक्रमास उपसरपंच शुभावली सावंत, सदस्य नेहा घाडीगावकर, दीपक घाडीगावकर, सुनीलदत्त जाधव, तेजस सावंत, संजय परब, माजी सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर सावंत, देवा रावले, ग्रामपंचायत अधिकारी मनस्वी माळकर, तलाठी भगवान मनवार, कृषीसेविका चव्हाण मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक पोकळे सर, लोकरे मॅडम, शिक्षक डोईफोडे, वाघमारे, वायभट्ट, बुचडे, आशा सेविका, बालमित्र, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील मान्यवर पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागींचे आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा