You are currently viewing तिरंगा उंच फडकू दे

तिरंगा उंच फडकू दे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुशीला पिंपरीकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तिरंगा उंच फडकू दे*

 

हे देशा मजला,मातीत तुझ्या मिळू दे

तिरंगा आमुचा,उंच उंच फडकू दे

/धृ/

 

घाव पारतंत्र्य,झेलूनि अंगावरती

घेतले स्वातंत्र्य,उदार प्राणावरती

ध्वनी राष्ट्रगीत,आकाशी दुमदुमू दे

तिरंगा आमुचा,उंच उंच फडकू दे /1/

 

तिरंगा अस्मिता,प्राण आम्हा देहातला

नको अवमान,स्पर्शून त्या जमिनी ला

त्याग,शांती,वृध्दी,प्रतिक सदा नांदू दे

तिरंगा आमुचा,उंच उंच फडकू दे/2/

 

ज्ञान विज्ञानात,चक्रांकित विकासाची

आस दिव्यत्वाची,आत्मनिर्भर ध्यासाची

देश अखंडित,नित्य प्रेरित राहू दे

तिरंगा आमुचा,उंच उंच फडकू दे/3/

 

ना इथे कुणी, श्रेष्ठ-ज्येष्ठ मानू

अवघे एक मनी संकल्प करू

मंत्र समानतेचा ध्यानी धरू दे

तिरंगा आमुचा उंच उंच /4/

 

संविधान विश्वास,गणतंत्र सन्मान

विविधतेत ऐक्य,राज्य स्वायत्त मान

रथ विकासाचा,पुढे पुढे च जाऊ दे

तिरंगा आमुचा,उंच उंच फडकू दे

/5/

 

सैनिक आमुचे, लढवय्ये धैर्यशाली

सीमेत रहावे, समर्थ आमुच्या चाली

भारत अमर रहे, नारा सर्वत्र घुमू दे

तिरंगा आमुचा, उंच उंच फडकू दे/6/

 

सौ.सुशीला पिंपरीकर नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा