You are currently viewing प्रा तुकाराम पाटील यांचा सहस्रदर्शन सोहळा व काव्यसंग्रह प्रकाशन

प्रा तुकाराम पाटील यांचा सहस्रदर्शन सोहळा व काव्यसंग्रह प्रकाशन

प्रा तुकाराम पाटील यांचा सहस्रदर्शन सोहळा व काव्यसंग्रह प्रकाशन -*

पुणे

नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे व
साईराजे पब्लिकेशन पुणे यांच्या वतीने प्रा.तुकाराम पाटील(ज्येष्ठ कवी गझलकार कादंबरीकार,कथाकार) यांचा सहस्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

प्रा. तुकाराम पाटील लिखित ‘वेदनेच्या अवतीभवती ‘या त्यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या८१ व्या वाढदिवसानिमित्त ८१ कवितांचा समावेश असलेला दर्जेदार काव्यसंग्रह साईराजे पब्लिकेशन ,पुणे यांनी प्रकाशित केला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राज अहिरराव, (ज्येष्ठ साहित्यिक, निगडी,)कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पांडुरंग भोसले,(प्राचार्य महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी व विचारवंत ) ,पुणे यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.

प्रा. तुकाराम पाटील यांच्या सहस्रदर्शन सोहळ्यानिमित्त मान्यवरांची मनोगते व्यक्त करण्यासाठी राजन लाखे, राजेंद्र गोलांडे, पुरुषोत्तम सदाफुले, बाळासाहेब जवळकर, प्रकाश रोकडे, श्रीकांत चौगुले, संदीप तापकीर, प्रा.सौ.सुरेखा कटारिया, राजेंद्र धावटे,सुरेश कंक,सुहास घुमरे, प्रशांत पोरे, दिनेश भोसले,माधव राजगुरू,अण्णा जोगदंड, अलफाज मुलाणी व विविध साहित्य संस्थांचे पदाधिकारी आणि स्नेही मंडळी उपस्थित राहणार आहेत

कार्यक्रम दिनांक-१६ऑगस्ट २०२५ शनिवार, कार्यक्रमाची वेळ दुपारी १२ ते ३पर्यंत कार्यक्रम स्थळ,सायन्स पार्कनाट्यगृह(एसी.),विज्ञान केंद्र, मुंबई पुणे हायवे शेजारी, चिंचवड पुणे १९ हे आहे .कार्यक्रमाचेआयोजन संयोजन-प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे (कवी वादळकार, पुणे)संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष नक्षत्राचं देणं काव्यमंच यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा