You are currently viewing सासवड येथे २८ वे आचार्य अत्रे साहित्य संमेलन

सासवड येथे २८ वे आचार्य अत्रे साहित्य संमेलन

आचार्य अत्रे यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्यिक उत्सवाचे यशस्वी आयोजन

पुणे :

स्व. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर (पुणे) आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य प्र. के. अत्रे यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आयोजित २८ वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी सासवड येथे संपन्न झाले.

समारोप समारंभात मान्यवर म्हणून सतीश पाटील, डॉ. विनायक खाडे, विजयराव कोलते, सकाळचे मा. सु. ल. खुटवड, डॉ. महेंद्र ठाकुरदास, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते, प्रा. देशमुख सर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

या संमेलनात विविध साहित्यिक उपक्रम, व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी आचार्य अत्रे यांच्या साहित्यिक योगदानाची आणि समाजप्रबोधनाच्या कार्याची आठवण करून दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा