*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
🌹 *अहिल्यादेवी*🌹
चोंडी शिवारात
धनगर समाजात
कन्या रत्न जन्मा आले
माणकोजी शिंदे कुळात
अहिल्या नाव छान
सद्गुणांची असे खान
मल्हार रावांची सुन
होळकरांची ती शान
नदीकाठी घाट, बारव
मंदिराची पुजा नित्य
शिवभक्त उपासना
प्रजेसेवेचे सातत्य
संपत्तीचा नसे गर्व
अन्नछत्र धर्मशाळा
प्रजेसाठी सर्व
अहिल्येने बांधियेल्या
कलाकार विद्वानांना
पदवी दिली नायक
नेतृत्व कुशलकांस
बनविलेस लायक
राजाश्रय सगळ्यांना
न्याय मिळे गरीबांना
हुंडाबंदी, दारुबंदी
मज्जाव बंदी चोरांना
दीन दुबळ्यांची माय
अशी सत्याने जगली
पुण्यतिथी दिनी आज
शब्द सुमने वाहिली
🌹🌹🌹🌹
*शीला पाटील. चांदवड.*
