*ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या युवा कोकण प्रदेशाध्यक्षपदी नवलराज विजयसिंह काळे यांची फेरनिवड*
*कोकण प्रदेश मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा समावेश*
*महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केली फेर निवड जाहीर*
*सिंधुदुर्ग—*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र श्री नवलराज विजयसिंह काळे यांचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या युवा कोकण प्रदेशाध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली. 2015 पासून ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कार्य श्री काळे करत आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांच्या नेतृत्वात कोकणमध्ये समाजाचे अनेक विषयांवर पाठपुरावा करण्यात आला. समाजाला एकसंघ करण्यासाठी महासंघाकडून श्री नवलराज काळे व त्यांचे सहकारी नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. 2015 साली नवलराज काळे महासंघाचे सभासद झाले, 2016 साली त्यांची वैभववाडी तालुका युवका अध्यक्षपदी निवड झाली. 2018 साली सिंधुदुर्ग जिल्हा युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली 2018 ते 2021 या कार्यकाळा मध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करत श्री काळे यांनी महासंघाचे नाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोचवले व समाजाला न्याय देण्यासाठी अनेक विषयांवर आवाज उठवले यामध्ये जिल्ह्यातील अनेक समाज बांधवांनी नवलराज काळे यांना प्रामाणिक सहकार्य केले आणि ते सर्व समाज बांधव अजूनही नवलराज काळे यांच्या संपर्कात आहेत. त्यानंतर 2021 साली श्री.काळे यांना कोकण प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे रायगड पालघर या पाच जिल्ह्यांचा समावेश होता. या पाचही जिल्ह्यामध्ये नवलराज काळे यांनी महासंघाचे अस्तित्व निर्माण करून त्या ठिकाणी महासंघाच्या वतीने धनगर समाजाच्या विविध विषयांना हात घालत समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याचा आढावा घेत महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने प्रवीण जी काकडे साहेब यांनी दिल्ली बोर्डाकडे फेर निवडीचा प्रस्ताव पाठवून मंजूर करून घेतला व तब्बल एक वर्षा नंतर ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी श्री काळे यांची कोकण प्रदेशाध्यक्षपदी फेर निवड जाहीर केली. यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर यांसहित मुंबई,मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांचा देखील समावेश करण्यात आला म्हणजे सिंधुदुर्ग ते मुंबई संपूर्ण कोकणाची जबाबदारी नवलराज काळे यांच्याकडे देण्यात आले असून भविष्यात नवलराज काळे यांच्या माध्यमातून धनगर समाजाला न्याय मिळेल अशी अशा व्यक्त करत प्रांतवाद पोटजातीयवाद निर्मूलन करून समाजातील विविध संघटना मंडळे प्रतिष्ठान एकत्रित करून महासंघाला बळकट करून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील अशी अशा व्यक्त करत प्रवीण जी काकडे यांनी नवलराज काळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नवलराज काळे यांच्या निवडी मुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
