You are currently viewing कणकवलीत बावनकुळे-राणे यांची विकासाभिमुख भेट

कणकवलीत बावनकुळे-राणे यांची विकासाभिमुख भेट

कोकणातील विकासकामे, लोककल्याणकारी उपक्रम व आगामी योजनांवर चर्चा

 

कणकवली :

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्यादरम्यान बुधवारी त्यांनी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सौ. नीलम ताई राणे यांच्या उपस्थितीत खासदार नारायणराव राणे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भेटीत कोकणातील सुरू असलेली व प्रस्तावित विकासकामे, लोककल्याणकारी उपक्रम तसेच आगामी योजनांविषयी सविस्तर संवाद झाला.

दोन्ही नेत्यांनी कोकणाच्या प्रगतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यटनविकास, तसेच शेतकरी व मत्स्य व्यवसायिकांच्या हिताच्या योजनांना गती देण्यावर भर दिला. या चर्चेत स्थानिक पातळीवरील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबतही विचारमंथन करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा