You are currently viewing *गावकऱ्यांच्या एकीने केली धमाल ; तुटलेले विजेचे खांबांने तयार केले नदीचे   पूल….*

*गावकऱ्यांच्या एकीने केली धमाल ; तुटलेले विजेचे खांबांने तयार केले नदीचे पूल….*

एकतेत शक्ती आहे. संघटना करून एकत्र आल्यास असाध्य असलेल्या गोष्टीही साध्य करता येतात, असे आपण नेहमीच ऐकतो. मात्र, कानपूरमधील उदयापूर गावातील नागरिकांनी एकत्र येत नदीवर चक्क पूल उभारण्याचे मोठे काम केले आहे. या गावकऱ्यांच्या एकीची सध्या खूप चर्चा सुरू आहे.

 

उदयापूर गावातील रिंद नदीवर पूल बांधण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. सरकार आणि प्रशासनाकडे ही मागणी लावून धरली. लोकप्रतिनिधींनाही पूलाबाबत मागणी करण्यात आली. मात्र, कोणीही प्रतिसाद देत नसल्याने गावकरी हताश झाले. अखेर त्यांनी स्वतःच नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. गावातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने आणि एकतेतून हे काम पूर्ण झाल्याचे गावकरी अभिमानाने सांगतात.

उदयापूर दाव कानपूर शहरापासून सुमारे 50 किलोमीटर दूर आहे. गावजवळून रिंद नदी वाहते. गावकऱ्यांना दुसऱ्या गावात जाण्यासाठी नदी पार करावी लागते. मात्र, नदीवर पूल नसल्याने नदी पार करण्यास गावकऱ्यांना अडचणींना सामना करावा लागत होता. नदी पार करून किंवा 15 किलोमीटरचा वळसा घालून गावकऱ्यांना प्रवास करावा लागत होता.

 

या समस्येवर सरकार आणि प्रशासन ढिम्म असल्याने आपणच यातून मार्ग काढला पाहिजे, असे गावकऱ्यांनी ठरवले. सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. हा पूल 60 ते 70 मीटर लांब आहे. तसेच तो दीड मीटर रुंद आहे. या पूलावरून गावकरी बाईकवरून सहजतेने प्रवास करू शकतात.

 

हा पूल बांधण्यासाठी गावातील तुटलेल्या वीजेच्या खांबांचा वापर करण्यात आला आहे. गावातील तुटलेले वीजेचे खांब एकत्र करून ते ट्रॅक्टर आणि हायड्रा मशीनद्वारे नदीत रोवण्यात आले. त्यावर बांबू आणि इतर खांब रोवून हा पूल तयार करण्यात आला आहे. या पूलाचा विद्यार्थ्यानांही फायदा होत आहे. त्यांना शाळेत जाण्यासाठी नदी पार करण्याची गरज नाही. पूलामध्ये दुसऱ्या गावात जाणे सोपे झाले आहे. सरकार आणि प्रशासनावर अवलंबून न राहता गावकऱ्यांनी एकत्र येत पूल बांधल्याने अनेक समस्या सुटल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा