वैभववाडीत भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा संपन्न
वैभववाडी
78 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी येथे भव्य तिरंगा यात्रा पार पडली. यात्रेत मोठ्या संख्येने वैभववाडीवासीय व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच अर्जुन रावराणे विद्यालयाचे विद्यार्थी ही सहभागी झाले होते. वैभववाडी भाजपा कार्यालय ते दत्त मंदिर चौक ते मच्छी मार्केट ठिकाण अशी यात्रा काढण्यात आली.
भारत माता की.. जय, वंदे मातरम्, जय जवान.. जय किसान आशी जोरदार घोषणाबाजी करून शहर दणाणून सोडले. वैभववाडी भाजपाच्या वतीने या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माजी संचालक दिगंबर पाटील, बंड्या मांजरेकर, नेहा माईणकर, संजय सावंत व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

