शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता उत्पन्नासंदर्भात नॉन क्रिमिलेयर बंधनकारक
सिंधुदुर्गनगरी
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व सर्व उपकंपन्यामार्फत (ओबीसी महामंडळ) राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये अर्ज सादर करतेवळी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रूपये 8 लक्ष पर्यंत सक्षम प्राधिकरणाने दिलेला दाखला सादर करावा लागत असे, याबदल्यात शासन शुध्दिपत्रकानुसार लाभार्थीने ग्रामीण व शहरी भागाकरीता कौटुंबिक वार्षिक उत्पन्नांसदर्भात नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी दिली आहे.
ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थीनीला इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के पेक्षा अधिक गुण असलेल्या व पदवी, पदव्युत्तर (डिग्री कोर्सेस )अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या किंवा किंवा पदवी प्रथम वर्षामध्ये असलेल्या लाभार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता ओबीसी महामंडळाकडे अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करतेवेळी उमेदवाराने ओबीसी जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, वय अधिवास, आधार कार्ड , पॅन कार्ड, रेशनकार्ड, बचत खाते बँक पासबुक,शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, रहिवासी पुरावा – दोन महिन्यातील लाईट बील, पासपोर्ट, गॅसबुक, टेलिफोनबील इ.पैकी एक,पालकांचे आधारकार्ड ,पॅनकार्ड व फोटो, तसेच 12 वी मधील मार्कशीट, प्रवेश घेतलेल्याचे प्रमाणपत्र व कोर्स फी इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराला महामंडळाकडून शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू असेपर्यंत बॅकेमार्फत देण्यात आलेल्या कर्जावरील व्याज भरल्यास महामंडळाकडून लाभार्थीस व्याज परतावाचा लाभ घेता येईल. याकरीता महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत किंवा जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सिंधुदुर्गनगरी, तालुका कुडाळ, दुरध्वनी क्रमांक 02362 228119 या पत्त्यावर संपर्क साधावा.
