You are currently viewing गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शालेय जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धेत माणगाव हायस्कूलचा प्रथम क्रमांक

गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शालेय जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धेत माणगाव हायस्कूलचा प्रथम क्रमांक

कुडाळ / प्रतिनिधी : वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा यांचे मार्फत गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शालेय जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धा सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठा येथे आयोजित करण्यात आली होती. शालेय जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धा लहान गट (इ. पाचवी ते इ.आठवी) मोठा गट (इ नववी ते इ. बारावी) अश्या दोन गटामध्ये आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये मोठ्या गटामध्ये (इ नववी ते इ. बारावी ) प्रशालेचा संगीत संघ सहभागी झाला होता. या संघाने सुमधुर गीतासह सादरीकरणाची अप्रतिम कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. विजेत्या संघास अजिंक्यपदाचे रोख पारितोषिक रु. ३५००/- स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रशालेचा संघाने संगीत शिक्षक श्री शंकर तामणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपादीत केलेल्या सुयशाबद्दल माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ आणि श्री वासुदेवानंद सरस्वती विदयालय माणगांवच्या मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावतीने समस्त सहभागी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक श्री शंकर तामणेकर सर यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा