सत्ता विनविते लेखणी आवरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सत्ता विनविते लेखणी आवरा*

(674)

निरक्षरांना घेऊन सोबती

रचतो इतिहास फक्त कवी

विसर त्याचा पडतो लवकर

लक्ष असत त्याच तप्त रवी

//1//

डोकावून पहातो रवीपल्याड

होतात डोळे *ओले त्याचे*

व्यथा काळजीचा तो पुजारी

तुकडे पडतात *काळजाचे*

//2//

श्रीमंतांचे किती *चोचले*

असले जरी किती *उर्मट*

गरीब पिचतात दलदलीत

त्यातच होतो त्यांचा शेवट

//3//

रेखाटून ही *विषम लढाई*

कवी टाकतो प्रकाश त्यावर

नारी शक्तीला आधार देऊन

नेऊन ठेवतो अत्युच्य पदावर

//4//

मूल्य जाणून *श्रम प्रतिष्ठेचे*

उभा रहातो *गरीबांचे मागे*

विरोध करतो घातक “शास्त्रांना”

घडवून आणतात जी जी *दंगे*

//5//

नसतो कोणता गणवेष कविला

बुरखे फाडतो तो *टराटरा*

असतो मात्र *त्वेष जरूर*

सत्ता विनविते लेखणी आवरा

//6//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

सोमवार 04 ऑगस्ट 2 0 2 5

प्रतिक्रिया व्यक्त करा