You are currently viewing केतकीपुष्प

केतकीपुष्प

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

🐍केतकीपुष्प🦚

 

 

हे रान केवड्याचे, गंधित होऊनि जाई,

हे फूल केतकीचे,बहरुन

फुलुनी येई,

काटेरी पर्णांच्या बंधनात

सुरक्षित राही.

परागाचा फुलोरा देई

सुगंधाची ग्वाही.

 

सार्या उग्र रानदर्पात फुलती

रानफुले ही

तृणपात्यातुनि डोकावती

कोमल कांती

अनेकरंगी बहरे सौंदर्य त्यांचे

नाजुकसेही

परी गंध सौंदर्य राज्ञीकेतकी

स्वर्णकांती.

 

केतकीच्या बनी नृत्य करीत

फुले मयुरपिसारा

केवड्याच्या गंधात डोलतो

फणाधारी नागराजा

सळसळत्या नागमोडी चालीत

रानावरी दरारा

हिरव्याकंच रानी, सुगंध लहरवे

मरुतराजा

 

विष्णूदेवा अतिप्रिय असे केवड्याचे स्वर्णपुष्प

श्री गणेशासही आवडे केतकी सुगंधी पुष्प

देवी देवतांना ही प्रिय भासे केवड्याचे गंधरुप

परी महादेवास हे वाहू नये

केतकीपुष्प.

 

पावसाळ्यात रानभर दाटे हा

केतकी सुगंध

हे फक्त फूल नव्हे हे तर असेही

आयुर्वेदी औषध

मोहवणारा सुवास त्याचा करी सर्वाना मंत्रमुग्ध

सुगंधी अत्तर, अगरबत्ती या रुपे

ठेवी ऋणानुबंध.

 

 

कवयित्री

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

प्रतिक्रिया व्यक्त करा