You are currently viewing ३० वर्षांचा प्रश्न सुटणार!

३० वर्षांचा प्रश्न सुटणार!

कबूलयतदार जमिनींच्या वाटपाला गती – मंत्री बावनकुळे यांची आंबोलीत ग्वाही

आंबोली, चौकूळ, गेळे गावातील कबूलयतदार जमिनीवरील वन विभागाची नोंद रद्द होणार

 

आंबोली – आंबोली, चौकूळ आणि गेळे येथील कबूलयतदार जमिनीवरील वन विभागाची नोंद लवकरच रद्द करून त्या जमिनी वाटपासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली. यामुळे सुमारे ३० वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आंबोलीच्या सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी ग्रामस्थांच्या समस्या आणि गावाची सामाजिक परिस्थिती यांचे निवेदन सादर केले. तीन दशकांपासून या विषयावर तोडगा निघत नसल्याने गावकऱ्यांना होणारा त्रास त्यांनी सविस्तर मांडला.

बैठकीस आंबोली प्रमुख गावकर श्री. शशिकांत गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. उल्हास गावडे, प्रांताधिकारी श्री. निकम, तहसीलदार श्री. पाटील, सर्कल श्री. यादव, तलाठी श्री. मुळीक यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

गावकऱ्यांच्या अपेक्षांना न्याय देण्याच्या दृष्टीने मंत्री बावनकुळे यांनी दिलेली ही हमी ग्रामस्थांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा