,,उद्योजक घडविण्याची अभिनव संकल्पना”…अँड.नकुल पार्सॅकर
सावंतवाडी
आज संपूर्ण देशात सगळ्याच बाबतीत प्रचंड स्पर्धा आहे.खाजगी असो वा सरकारी रोजगार दिवसेंदिवस कमी होत आहेत. अशावेळी तरुणाईला उद्योग क्षेत्रात आवड निर्माण करण्यासाठी कुडाळ येथील नेहमीच नवीन संकल्पना राबवणारे आकार फाउंडेशनचे गजानन कादंळगावकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपल्याच जिल्ह्य़ात उद्योजक घडविण्याचा जो नवीन प्रयोग सुरू केलेला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे.
आज कुडाळ येथे आकार फाउंडेशन, संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ एम.आय.डि.सी.इंड़.असोसिएशन व रोटरी क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेसाठी निवडलेल्या युवक युवतीना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या पहिल्याच कार्यशाळेत प्रणय तेली,राजेंद्र केसरकर व अविनाश वालावलकर यानी मार्गदर्शन केले.
याचे आज संत राऊळ महाराज महाविद्यालयात उदघाटन झाले.यावेळी महाविद्यालयाच्या मा.प्राचार्या तसेच आयोजक संस्थाचे प्रतिनिधी श्री गजानन कादंळगावकर, कुडाळ रोटरी क्लबचे श्री राजेंद्र पवार, श्री मगदूम, श्री आनंद वैद्य,कुडाळ एम आय. ङीसी.इंड.असोसिएशनचे अँड.नकुल पार्सॅकर,श्री नितीन पावसकर,जिल्ह्य़ा व्यापारी संघाचे तायशेटे इ.मान्यवरांनी उपस्थिता समोर आपले विचार मांडले.यावेळी सर्वश्री शशिकांत चव्हाण, प्रमोद भोगटे,अमित वळंजू आदि उपस्थित होते.
