श्रावणी सोमवार निमित्ताने वेंगुर्ले येथे श्री देव रामेश्वर मंदिरात बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा व १३५ वरद शंकर पूजा
वेंगुर्ले
वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आज श्रावणी सोमवार त्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा व विविध फळांची पूजा याची आरास करण्यात आली होती व १३५ वरद शंकर पूजा बसविण्यात आल्या आहेत. या धार्मिक वातावरणामुळे दिवसभर मंदिर परिसर भक्तीमय बनला आहे. मंदिरात सायंकाळी झालेले महिलाचे भजन ही लक्षवेधी ठरले.
सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारच्या दिवशी या मंदिरात वरद शंकर पूजा केल्या जातात. भाविकांसाठी ही पर्वणीच असते. आज तिसरा श्रावणी सोमवार असल्याने भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी झाली होती.
