*स्टेपिंग स्टोन स्कूलचा कु. सोहम देशमुख बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल :**
सावंतवाडी
९ ऑगस्ट २०२५ रोजी बांदा येथे झालेल्या (१४,१७,१९ वर्षांखालील) जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले. प्रशालेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी कु. सोहम देशमुख याने वरील स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त केले. तर इयत्ता पाचवीचा कु. शौर्य चव्हाण यांने वरील स्पर्धेत पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकावले. या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी त्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
