You are currently viewing शेतीयंत्र दुरुस्तीचे मास्टर ट्रेनिग देणार: डॉ.बी.एन.सावंत

शेतीयंत्र दुरुस्तीचे मास्टर ट्रेनिग देणार: डॉ.बी.एन.सावंत

वेंगुर्ला येथे शेती यंत्र दुरुस्ती प्रशिक्षण

वेंगुर्ला

पारंपरिक शेती सद्या आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने आज शेतकरीवर्ग यत्रिकिकरणाकडे वळला आहे. मात्र, यंत्रेही कालांतराने दुरुस्तीस येत असल्याने शेतक-यांना शेतीयंत्र दुरुस्तीचे प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी शेती यंत्र दुरुस्तीचे बेसिक ट्रेनिग आयोजित करण्यात आले आहे. भविष्यात दोन दोन दिवसांचे मास्टर ट्रेनिगही येथे आयोजित करण्यात येईल, असे प्रतिपादन वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.बी.एन.सावंत यांनी केले. वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र, आत्मा व लुपिन फाऊंडेशन,सिधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात सहा दिवसांचे शेती यंत्र दुरुस्ती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ.बी.एन.सावंत व जिल्हा कृषी अधिकारी एस.एन.मेहेत्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसंचालक दशरथ घोलप, लुपिन फाऊंडेशनचे योगेश प्रभू, नारायण परब, संतोष कुडतरकर, आत्माचे धनंजय गोळम, वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ.विजयकुमार देसाई आदी उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरात ६० जणांनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा