मुंबई : स्वतः मधील आचार सुधारत नाही तोपर्यंत विचारात सुधारणा होणार नाही.असे भागवताचार्य ह.भ.प. गुरूवर्य संतोष महाराज सावरटकर यांनी भांडुपगाव येथे श्रावण मासा निमित्त ‘ संगीत महाभारत कथा; पारायण आणि नामस्मरण पंधरावडाचे आयोजन केले असता उपस्थित साधक भक्तांना प्रबोधन करताना सूचित केले. प्रारंभी गुरूवर्याच्या पाद्य पूजनाने करण्यात आला . ह.भ.प. सावरटकर पुढे म्हणाले की, भक्तांनी परमार्था मध्ये परिस्थिती सुधारण्यासाठी येऊ नका, तर मनस्थिती सुधारावी म्हणून अवश्य या! शेवटी परिवर्तन हा सृष्टीचा नियम असून त्याकरिता दुष्टीकोन बदल्यावयास हवा म्हणून चारित्र्य व कर्म चांगले असेल पाहिजे म्हणजे तुमचं कोणी काही बिघडविणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे असे सांगत १७ तारीख पर्यंत संपन्न होणाऱ्या कथेचा आस्वाद घ्या असे सुचवले. या पारायण सोहळ्याचे नियोजन भांडुपगाव वारकरी संप्रदाय महिला मंडळ, युवा मंच यांनी केले आहे. सदर नामस्मरणाचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी भाविक सहभागी होत आहेत.
