You are currently viewing ‘मनस्पर्शी’ संस्थेची रक्षाबंधन विशेष काव्य मैफल उत्साहात संपन्न

‘मनस्पर्शी’ संस्थेची रक्षाबंधन विशेष काव्य मैफल उत्साहात संपन्न

ठाणे – ‘मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान’ यांच्या वतीने रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भगिनींना समर्पित ऑनलाईन काव्य मैफल ७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजता पार पडली.

अध्यक्षा कु. मानसी पंडित यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोषाध्यक्ष कु. निखिल कोलते यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. गझलकार डॉ. सुभाष कटकदौंड अध्यक्षस्थानी होते.

 

राज्यभरातील १५ कवी-कवयित्रींच्या सादरीकरणांनी रसिकांची मनं जिंकली. सहसंचालिका सौ. जयश्री शेळके शिळीमकर यांनी तांत्रिक संयोजन पाहिले. सचिव राजेश नागुलावर (राजमन) यांनी आभार प्रदर्शन केले.

 

हा साहित्यिक सोहळा ‘मनस्पर्शी’ संस्थेच्या संवेदनशीलतेचे प्रतीक ठरला आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या विशेष अशा ऑनलाइन संमेलनात खालील प्रमाणे कवी कवयित्री सहभागी झाले होते

अरुणा मुल्हेरकर, अंजना कर्णिक, सौ. राधा गर्दे, शोभा वागळे, सौ. राधिका भांडारकर, यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे, श्रीमती. स्नेहलता काळे, सौ. ज्योत्स्ना तानवडे, अंबादास मुकुंद ठाकूर, सौ. पल्लवी भागवत, नरेंद्र गंधारे, सौ. प्रांजली हारकुड, सौ. रंजना बोरा, सौ. रेणुका धनंजय मार्डीकर महाराष्ट्र राज्यातील तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातील तसेच विदेशातून देखील या मैफिलीमध्ये लाभलेला कवी कवयित्रींचा सहभाग संस्मरणीय ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा