*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*एक धागा रेशमाचा*
आला महिना श्रावण
सण लेऊन आगळा
एक धागा रेशमाचा
रक्षा बंधन सोहळा
भावा बहिणीचे नाते
धागा रेशमी जोडतो
प्रेम जिव्हाळा तिथे
मनी ओलावा राहतो
औक्षवंत भाऊ राहो
घाली साकडे देवाला
ओवाळीते भाऊराया
राखी बांधून हाताला
नाते आजन्म जपावे
धागा बांधून रेशमी
भाऊ रक्षिता बहिण
देई आयुष्याची हमी
सण सोहळा साजरा
घरोघरी भारतात
हाच गोडवा प्रितीचा
भाऊ बहिण नात्यात
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर , धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.

