अवयवदान पंधरवडा निमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जनजागृती
सिंधुदुर्गनगरी
मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने अवयवदान पंधरवडा या उपक्रमाचे औचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे जिल्ह्यातील उपस्थित शिकावू चालक उमेदवार तसेच उपस्थित कर्मचारी यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तसेच अवयवदान या संबंधीची माहिती देवून जनजागृती करण्यांत आली. तसेच उपस्थितांना अवयवदानाची शपथ देण्यांत आली.
या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक वाहन निरिक्षक पराग मातोंडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवम शिवरकर तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे समाजसेवा अधिक्षक सुनिल कुंडगिर आदी उपस्थित होते.

