ध्वजदिन निधी संकलनात माजी सैनिकाचा हातभार
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या अस्थापनेवरील लिपिक टंकलेखक, माजी सैनिक प्रसाद नरहरी राणे, रा. तळगाव (राणेवाडी). ता. मालवण यांनी आपल्या ५१ वा वाढदिवस साजरा करण्यावर वायफळ खर्च न करता त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्गच्या ध्वजदिन निधी संकलन- २०२४ करीता रोख रक्कम रु. ५,१००/- वैयक्तिक देणगी स्वरुपात दिली. तसेच त्यांनी त्यांच्या तळगावातील रामेश्वर हायस्कूल करीता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विद्याथ्यांच्या शिष्यवृत्ती करीता रक्कम रु.५,१००/- वैयक्तिक देणगी स्वरुपात दिली. माजी सैनिक प्रसाद नरहरी राणे हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रम, अनाथ आश्रम यांना आर्थिक मदत करत असतात.
या अनुषंगाने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांचे हस्ते माजी सैनिक प्रसाद नरहरी राणे यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यांच्या स्तुत्य उपक्रमांबद्दल जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रशंसा केली व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभकामना दिल्या. तसेच त्यांनी सर्वांना ध्वजदिन संकलन निधीस सढळ हस्ते मदत करा, असे आवाहन केले.
या प्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर व कार्यालयाचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.

