You are currently viewing स्थानकाच्या २ नंबर प्लॅटफॉर्मवरील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे हाल

स्थानकाच्या २ नंबर प्लॅटफॉर्मवरील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे हाल

स्थानकाच्या २ नंबर प्लॅटफॉर्मवरील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे हाल; अतिरिक्त एक्झिटची मागणी

कणकवली

गणपती उत्सव तोंडावर आलेला असताना कोकणात परतणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांची वर्दळ लवकरच वाढणार आहे. मात्र,  रेल्वे स्थानकावरील २ नंबर प्लॅटफॉर्मवरील अपुऱ्या पायऱ्यांच्या (जिन्यांच्या) सुविधेमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार मित्र सदधा यांनी आज पालकमंत्री नितेश राणे आणि रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सदर प्लॅटफॉर्मवर केवळ मधोमध एकच जिना असल्यामुळे प्रवाशांना सुमारे ३०० मीटर अंतर चालत जावे लागते. यामुळे वृद्ध, अपंग, अंध व्यक्ती, महिला, लहान मुले आणि त्यांच्यासोबतचे सामान घेऊन येणाऱ्यांना विशेषतः रात्रीच्या वेळी अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागतो.

निवेदनात, या प्लॅटफॉर्मवर किमान दोन एक्झिट दरवाजे (जिने) उपलब्ध करून द्यावेत आणि बाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी केली आहे. गाड्या रात्री अपरात्री येत असल्याने प्रवाशांना थेट उतरण्याची आणि सहज बाहेर पडण्याची सुविधा असणे गरजेचे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

या मागणीवर प्रशासन सकारात्मक पाऊले उचलेल, अशी अपेक्षा प्रवाशांमध्ये व्यक्त केली जात आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा