You are currently viewing कणकवलीत ११ ऑगस्टला कवितेचा जल्लोष;

कणकवलीत ११ ऑगस्टला कवितेचा जल्लोष;

कणकवलीत ११ ऑगस्टला कवितेचा जल्लोष; “कवी कट्टा”त काव्यरसिकांची हजेरी अपेक्षित

कणकवली –

कोकण मराठी साहित्य परिषद, कणकवली शाखेच्यावतीने आगामी ११ ऑगस्ट रोजी “कवी कट्टा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कणकवली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ येथे दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे.

या कवी कट्ट्यात सहभागी होण्याची संधी सर्व स्थानिक व नवोदित कवींना देण्यात आली आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी कोमसाप कणकवली शाखेचे सचिव श्री. निलेश ठाकूर (९४२१९१९०७८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन कोमसाप कणकवली शाखेच्या अलीकडील बैठकीत निश्चित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखेचे अध्यक्ष माधव कदम, संयोजक गणेश जेठे, तसेच ज्येष्ठ कवयित्री कल्पना मलये यांनी कवी आणि रसिक श्रोत्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कवितेच्या माध्यमातून भावविश्व उलगडणाऱ्या या “कवी कट्टा” कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा