You are currently viewing होऊन जाईल सर्दी तुजला

होऊन जाईल सर्दी तुजला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*होऊन जाईल सर्दी तुजला*

 

किती वेळ तू तिष्ठत उभी ?

होऊन जाईल सर्दी तुजला

सोडून कुरुळे *काळे केस*

आव्हान देतात आज मजला….1

नको हसून *मोहात पाडूस*

महगात पडेल तुला *मिठी*

आज मिळाला मोकळा वेळ

सुखावून जाईल आज *दिठी*….2

श्रावण सरी अन धुके कोवळे

सहस्ररश्मीचे *आहेर वेगळे*

उडत जातील समस्त *बगळे*

आणणार नाहीत आज अडथळे..3

पक्षीही आहेत किती *शहाणे*

करून निघाले आपणास टाटा

*भेट देऊन एकांताची “आज”*

त्यांनी धरल्या आपापल्या वाटा….4

कसे *कळाले* आज तयांना

हवाय अपणास मोकळा समय

धुकेही आलय मदत करायला

सोडवून जाणार कठीण *प्रमेय*…5

सृष्टीही नेसून *हिरवी पैठणी*

तयार राहीली *कधी पासून*

ढगही गडगडतील थोडा वेळ

निघून जातील थोडे *बरसून*……6

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा