You are currently viewing मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वैभववाडी येथे उद्या महारक्तदान शिबिराचे आयोजन 

मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वैभववाडी येथे उद्या महारक्तदान शिबिराचे आयोजन 

मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वैभववाडी येथे उद्या महारक्तदान शिबिराचे आयोजन

वैभववाडी l प्रतिनिधी :

वीरपुत्र मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार दि. ७ ऑगस्ट रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी मेजर कौस्तुभ रावरणे यांना राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रक्तदान शिबिर हे मेजर कौस्तुभ रावराणे संयोजन समितीच्या वतीने येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी मेजर कौस्तुभ रावराणे यांचे वडील श्री प्रकाशकुमार रावराणे, आई सौ. ज्योती रावराणे या उपस्थित राहणार आहेत.

गुरुवारी सकाळी ९ ते २ या वेळेत शिबिर होणार आहे. या शिबिरात नागरिक, युवक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे संयोजन समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा