You are currently viewing आदरणीय रमाकांत खलप तथा भाई यांचा आज जन्मदिवस*

आदरणीय रमाकांत खलप तथा भाई यांचा आज जन्मदिवस*

*आदरणीय रमाकांत खलप तथा भाई यांचा आज जन्मदिवस*,,,,,,,,,

गोव्याच्या देवभूमीत जन्मलेले,,, राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उच्च विद्याविभूषित,, सुसंस्कृत,, शालिन,, रुबाबदार व्यक्तिमत्व लाभलेले नेतृत्व म्हणजेच *भाई*,,,,,,,,,,

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री लोकनेते दयानंद बंदोडकर उर्फ भाऊसाहेब यांचे 1973 साली निधन झाले, स्व भाऊसाहेब प्रतिनिधित्व करत असलेल्या मांद्रे विधानसभा मतदार संघात पोट निवडणूक लागली,,,, त्याच वेळी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना,, फक्त उच्च विद्यावीभूषित,अभ्यासु व , प्रभावी वक्तृत्व असलेला तरुण ह्या गुणांच्या आधारे गोव्यातील जनतेने व स्व भाऊसाहेबांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने भाईंना निवडणुकीत उमेदवारी दिली आणि भाई चांगल्या मताने निवडुन आले त्यानंतर सलग सहा निवडणुकीत भाई नी मांद्रे विधानसभा मतदारसंघांचे प्रतिधित्व केले,,,तसेच भाईंनी अकराव्या लोकसभेत उत्तर गोव्याचे प्रतिनिधित्व करत असतांना ,, भाई नी केंद्रात केंद्रीय कायदा मंत्री म्हणून अत्यंत प्रभावी काम केले,,,,,
आजच्या तत्वशून्य बाजारू राजकारणात,जिथे लोकशाही च शिल्लक नसलेल्या,, राजकारणाचा चिखल झालेल्या वातावरणात,,, तत्वनिष्ठ, मूल्यांधिष्ठित, राजकारणं करणारे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच नेते ह्या देशात आहेत आणि त्यात सर्वात वरचे स्थान हे भाईंचे आहे,,,,,,,,,,
राजकारण,, समाजकारण,, साहित्य,, शिक्षण,, सहकार,, कायदा,, अर्थ,, आरोग्य,, कला,, क्रीडा,, अशा सर्वच क्षेत्रात सक्रिय वावर असणारे,,, ज्यांच्यावर सरस्वती प्रसन्न आहे असे हे गोव्याच्या सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव अष्टपैलू मातब्बर नेतृत्व,,,,,,*अनेक वर्षे आमदार,, खासदार,,,, गोव्याचे उपमुख्यमंत्री ते केंद्रीय कायदामंत्री म्हणून देशात निर्माण केलेले स्थान,,,, आजही संसदेतील भाईची कामगिरी अजरामर आहे,,, अत्यंत अभ्यासु व प्रभावी वक्ते अशी भाईंची खास ओळख आहे,, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विषयाची जाण असलेले असे हे कुशाग्र बुद्धीचे वलयांकित नेतृत्व*,,,,,, आजपर्यंत राष्ट्रीय स्थरावर ज्यांनी ज्यांनी आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर संसद गाजवली त्यात भाईंचे स्थान फार वरचे आहे,,,,, तो अभ्यासूपणा व सुसंस्कृत पणा आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात दिसत नाही,, सध्याच्या राजकारणात संसद म्हणजे एकमेकांची राजकीय धुणी धुण्याचा आखाडा बनला आहे,,,, भाईंच्या खासदारकी च्या कारकिर्दीत,, प्रमोद महाजन,, मधु दंडवते,, अटलबिहारीं वाजपेयी,,जॉर्ज फर्नांडिस लालकृष्ण अडवाणी,, सुषमा स्वराज असे कितीतरी दिग्गज संसदपटू होते आणि *त्या कोंदणात ह्या गोमंतकीय सुपुत्राची कामगिरी अत्यंत प्रभावी असायची,, तेथे बौद्धिक व वैचारिक देश हिताचा संघर्ष व्हायचा,,, भाई बोलायला उभे राहिले की साक्षात सरस्वती चे दर्शन घडायचे,, भाईंच्या मुखातून फुले पडत असल्याचा भास होई,,,, भाईंचे प्रत्येक भाषेवर प्रभुत्व असल्याने भाईची संसदेत एक वेगळीच छाप असायची*,,,,,,,,,
त्या वेळी प्रमोद महाजन यांचे भारतीय लोकशाही वर संसदेत भाई बद्दल गौ्रोदगार काढलेले एक भाषण फार गाजले होते,,त्यावेळच्या केंद्रीय मंत्रीमंडळात पहिल्या प्रभावी पाच मंत्र्यांमध्ये भाई अग्रस्थानी होते,,,,,, राजकीय क्षेत्रात गोवा म्हणजे रमाकांत खलप अशी गोव्याची ओळख संपूर्ण देशात आहे,,,,, भाईंचा राजकीय प्रवास आम्ही जवळून अनुभवला आहे !!!!,,,,,,, आम्ही भाग्यवान आहोत,, आम्हाला नेहमीच भाईंचा सहवास लाभला,, मार्गदर्शन लाभले,, अनेकदा भाई सोबत दौरे करण्याचा योग आला,,,भाईंचा मित्रपरिवार फार मोठा असुन देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे भाईंचे मित्र आहेतच,, दिल्ली च्या राजकीय वर्तुळात आजही भाईचा सर्वपक्षीय नेत्यांमध्ये,, फार मानसन्मान व आदर आहे, ,,,,कोणत्याही केंद्रीय नेत्याकडे भाईंना अपॉइंटमेंट लागत नाही,, भाई येताहेत म्हटल्यावर भाईंचे आगत्यपूर्वक स्वागत होते हे आम्ही स्वतः अनुभवले आहे,,,,ज्या ज्या वेळी भाईंच्या सहवासात आलो त्या त्या वेळी काही ना काही नविन शिकायला मिळाले,,,,,,,*भाई म्हणजे एक चालते बोलते ज्ञानपीठ च आहे*,,,,,,,,,!!!
गोव्यामध्ये सहकार व शिक्षण क्षेत्रात भाईंचे फार मोठे योगदान आहे,,, साहित्य क्षेत्रात तर भाईंचा फार मोठा वावर आहे,, कोणत्याही साहित्यिकां कडे नसेल एवढा मोठा साहित्याचा संग्रह भाईंकडे आहे,,,,,,,,, कोणत्याही विषयावर अघात ज्ञान असलेले भाई सारखे फार कमी नेते राजकीय क्षेत्रात आहेत,,,आज राजकारणाचा ढाचा च बदलला असुन पैसा हा राजकारणाचा पाया झाल्यामुळे उच्चशिक्षित,, बुद्धीजीवी लोक ह्या बजबजलेल्या क्षेत्रात येऊ इच्छित नाहीत,, त्यामुळे खऱ्या अर्थाने समाजाचे पर्यायाने आपल्या राज्याचे,, देशाचे फार मोठे नुकसान होते,,, आणि म्हणूनच भाई सारख्या नेतृत्वाची आज राज्याला व देशाला गरज आहे,,,,,,!!, आजच्या ह्या गुंडा पुंडा च्या सत्तेतील वावरावर व देशोधडीला लागलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करतांना केंद्रीय मंत्री मा, नितीन गडकरी यांनी आपल्या एका भाषणात एक मार्मिक टिपणी अशी केली होती *घोडे को नहीं मिल रहा घास और गधे खा रहे है चवनप्राश*,!!!!!!!!, हे सद्यस्थितीत तंतोतंत खरे आहे,,ज्यांचेकडे गुणवत्ता आहे ते बाहेर आहेत आणि हुजरे मुजरे सत्तेत आहेत आणि यात नशिबाचा सुद्धा बराचसा भाग असतो,,,,भाईंच्या बाबतीत बरेचदा नशिबाचे दान उलटे पडलेले आहे,,,,, परंतु आम्हाला विश्वास आहे, भाईंनी सर्वच क्षेत्रात आतापर्यंत केलेले काम वाया जाणार नाही,,, केव्हा ना केव्हा भाईंच्या पदरी सत्तेचे दान हे पडणारच!!!!,, असा आमचा ठाम विश्वास आहे,,,,,
भाईंच्या कर्तृत्वावर लिहायचे म्हटले तर कागद अपुरे पडतील,,, परमेश्वराने लाखात नव्हे तर करोडो मध्ये भाई सारखे एखादेच अष्टपैलू व्यक्तिमत्व जन्माला घातलेले असते,,,,,,,,, तरी आजच्या ह्या शुभदिनी *ह्या आमच्या लाडक्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा,,, परमेश्वर भाईंना उदंड आयुष्य व निरोगी आरोग्य देवो व भाईंच्या सर्व मनोकामना पुर्ण करोत हिच परमेश्वराकडे प्रार्थना* 🙏
*शुभेच्छुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय,,,,,,,,*
*सावंतवाडी,,,,,,,*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा