You are currently viewing कुणकेश्वर मंदिरात १० व ११ ऑगस्ट रोजी धार्मिक विधी

कुणकेश्वर मंदिरात १० व ११ ऑगस्ट रोजी धार्मिक विधी

देवगड :

श्री देव कुणकेश्वर देवस्थानचा रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी दादरा वार्षिक उत्सव होणार असून त्या दिवशी दुपारी २ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत मंदिर परिसर भाविकांसाठी बंद राहणार आहे. यामध्ये कुणकेश्वर मारुती मंदिर तिठा, कुणकेश्वर महापुरुष पार (बाजारपेठ), मिठमुंबरी बीच ते कुणकेश्वर मंदिर या सर्व मार्गांवर वाहतूक बंद राहणार आहे.

तसेच दिनांक ११ ऑगस्ट २०२५ , सोमवार रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत भावई वार्षिक साजरा होणार असल्यामुळे त्या वेळी मंदिरातील दर्शन बंद राहील.याची भाविक भक्तांनी नोंद घेत श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. एकनाथ तेली यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा