You are currently viewing प्रधानमंत्री किसान निधी वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

प्रधानमंत्री किसान निधी वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

प्रधानमंत्री किसान निधी वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित वाराणसी येथे कार्यक्रम
  • ओरोस येथील कृषी महाविद्यालयात पाहता येणार थेट प्रक्षेपण 

सिंधुदुर्गनगरी

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. पी. एम. किसान योजनेअंतर्गत २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर शनिवारी दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी जमा होणार आहे.

या योजनेअंतर्गत देशपातळीवर संपन्न होणारा मुख्य कार्यक्रम वाराणसी येथे होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शनिवारी दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वा हा कार्यक्रम संपन्न होणार असून पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी  शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी महाविद्यालय ओरोस ता. कुडाळ येथे होणार आहे. ओरोस येथील थेट प्रक्षेपण कार्यक्रम कृषी विभाग सिंधुदुर्ग कृषी विज्ञान केंद्र विभागायांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आला आहे.

देशपातळीवरील मुख्य कार्यक्रम शेतकऱ्यांना लिंकद्वारे मोबाईलवर सुद्धा पाहता येणार आहे. ओरोस येथील थेट प्रक्षेपण कार्यक्रमात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे व कृषी विज्ञान केंद्र प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा